नांदेड - नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी आज व उद्या (21 व 22 मार्च) अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवाव्यात, अशा सूचना औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाडयातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार नांदेडमध्येही जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश दिले होते. पण, नांदेडकर मात्र बिनधास्त रस्त्यावर वावरताना दिसून आले. अखेर जिल्हाधिकारी विपीन इंटनकर यांना स्वतः गर्दीच्या ठिकाणी उतरून आवाहन करावे लागले.
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विडियो कॉन्फ्रेंसिंगव्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोनाचा प्रादूर्भाव व प्रसार यात झपाट्याने वाढ होत आहे. या विषाणूला रोखण्यासाठी जनतेने स्वयंस्फुर्तीने बंद पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी जनतेने घराबाहेर पडू नये, अशी सूचना असताना नांदेडकर मात्र बिनधास्त होऊन रस्त्यावर वावरताना दिसत होते. शेवटी पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरून शहरातील गर्दी असणाऱ्या ठिकाणच्या नागरीकांची गर्दी दूर केली.
हेही वाचा - कोरोना प्रभाव: सचखंड गुरुद्वारात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी