ETV Bharat / state

Children Drown in Lake : नांदेडात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू; बिलोली तालुक्यातील तीन शाळकरी मुलांचा समावेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 9:36 AM IST

Children Drown in Lake : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बामणी येथे पाझर तलावात पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेल्यामध्ये दोन सख्ख्या भावंडाचा समावेश आहे.

Children Drown in Lake
Children Drown in Lake

नांदेड Children Drown in Lake : एकीकडे राज्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह पहावयास मिळतोय. तोच दूसरीकडे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मात्र मन सुन्न करणारी घटना घडलीय. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. बिलोली तालुक्यातील बामणी गावात ही ह्रदयद्रावक घटना घडलीय. मृतकांमध्ये दोन सख्या भावांचाही समावेश आहे. देवानंद पिराजी गायकवाड (वय १५), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२), वैभव पंढरी दुधारे (वय १५) अस मृतकांची नावे आहेत.

दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू : बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बामणी येथील गावाशेजारील तलावात विसर्जन करण्यात आलेली गणपती मुर्ती तलावात पाण्यावरती आली आहे, अशी माहिती मिळाल्यावरून गावातील पाझर तलावात देवानंद गायकवाड, बालाजी गायकवाड, वैभव दुधारे व अन्य एक जण तलावाकडे पाहण्यासाठी गेले होते. तलावाजवळ आले असता तलावातील पाणी पाहून मुलांना पोहण्याचा मोह आवरला नाही. चारपैकी तीन मुले पाण्यात उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज नसल्याने तिन्ही अल्पवयीन मुलं तलावात बुडत असल्याचं दिसताच सोबत असलेल्या मुलानं गावात येऊन सांगितलं. ही बातमी गावात पसरताच गावातील काही लोकांनी पाझर तलावाकडं धाव घेतली व त्यांचा मृतदेह शोधाशोध करून बाहेर काढले. मात्र, गावकरी येईर्पर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतातील देवानंद व बालाजी हे दोघे सख्खे भाऊ आहेत, तर वैभव हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर फार मोठं संकट आलंय.

घटनेमुळं सर्वत्र शोककळा : दुसऱ्या एका घटनेत नांदेड शहरातील गोवर्धन घाटावर सायंकाळी गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. या तरूणाची अद्याप ओळख पटली नसून पोलीस ओळख पटविण्याचं काम करत आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या या घटनांमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जतेय.

हेही वाचा :

  1. Ganesh Visarjan २०२३ : गणेश विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना; एकाच कुटुंबातील चार मुलं बुडाली, दोघांचा मृत्यू
  2. Ganesh Visarjan 2023: गणेश विसर्जनाला गालबोट, गुहागरमध्ये अपघातात दोन जणांचा मृत्यू, नाशिकमध्ये नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू
  3. Ganesh Visarjan 2023 : जीव धोक्यात घालून गणरायाला निरोप; पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.