ETV Bharat / state

नांदेडमधील गंजगावच्या रेती घाटावर प्रशासनाची धाड; रेती ठेकेदारासह १६ जणांवर गुन्हा दाखल - JCB

हाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील गंजगाव वाळू घाटावर बिलोली पोलीस उप अधीक्षकांच्या पथकाने १० जूनला दुपारी चारच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत तब्बल ८३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

गंजगावच्या रेती घाटावर पोलीस विभागाने धाड टाकली.
author img

By

Published : Jun 12, 2019, 1:55 PM IST

नांदेड - महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील गंजगाव वाळू घाटावर बिलोली पोलीस उप अधीक्षकांच्या पथकाने १० जूनला दुपारी चारच्या सुमारास धाड टाकली. यावेळी अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे २ जेसीबी व ७ ट्रक ताब्यात घेत ठेकेदारासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेले वाळूचे ट्रक

या धाडीत तब्बल ८३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील मांजरा नदी पात्रातील गट क्रमांक ३५७, ३५८, ३५४, ३५५, ३५६ या शासकीय घाटातून अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. वाळू घाटाचा ठेका घेणाऱ्या कंत्राटदाराकडून वाळू उपशाबाबत नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे. असे असताना सर्व नियम धाब्यावर बसवत ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा अधिक पटीने वाळू उपसा केला जात होता.

वाळूघाटात जेसीबीद्वारे उपसा होत असल्याची माहिती मिळताच बिलोली पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ यांच्या पथकाने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास गंजगाव वाळूघाट गाठला. येथे २ जेसीबीद्वारे वाळू उपसा करण्यात येत असल्याचे दिसून आले. तसेच वाळूची वाहतूक करण्यासाठी सात ट्रक घाटात उभे असल्याचे आढळले. त्यात ए.पी. २५ एक्स ६८६९, ए.पी. १६ टी.यु. ८८७२, ए.पी. २५ टि.यु. ०२४२, एम.एच. १२ एफ.एस. ६४२२, एम.एच. ४३ वाय ९२२२, एम.एच.१९ झेड. ६५००, एम.एच. २६- १५०७ या वाहनांचा समावेश होता. ही सर्व वाहने व दोन जेसीबी जप्त करुन बिलोली पोलीस ठाण्यात आणण्यात आली.

याप्रकरणी गंजगाव येथील वाळू ठेकेदार प्रविण रेड्डी (साई शक्ती कन्स्ट्रक्शन, निझामाबाद), देवेंद्र रेड्डी (व्यवस्थापक), नवीन रेड्डी यांच्यासह वाहनांचे चालक व मालक अशा एकुण १६ जणांविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव मष्णाजी वाडेकर यांच्या फिर्यादी वरून कलम ३७९, १८८, ३४ भादंवि व गौण खनिज कायदा २०, २१ अन्वये बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनाचे पितळ उघडे पडल्याची चर्चा परिसरात जोमात सुरू होती.

Intro:नांदेड - गंजगावच्या रेती घाटावर पोलिस विभागाची धाड २ जेसीबी यंञासह ७ वाहनांवर कारवाई रेती ठेकेदारासह १६ जनांवर गुन्हा दाखल.

नांदेड : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागातील गंजगाव वाळूघाटावर बिलोली पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाने १० जून रोजी दुपारी चारच्या सुमारास धाड टाकली. अवैधरित्या वाळूचा उपसा करणारे दोन जेसीबी व सात ट्रक ताब्यात घेत ठेकेदारासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.Body:
या धाडीत तब्बल ८३ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.तालुक्यातील मांजरा नदी पात्रातील गट क्रमांक३५७, ३५८, ३५४, ३५५, ३५६ या शासकीय घाटातून अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. वाळू घाटाचा ठेका घेणाऱ्या कंत्राटदाराकडून वाळू उपशाबाबत नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे.त्यातील मुख्य अट म्हणजे वाळू उपसा करण्यासाठी कोणत्याही स्वरुपाचे यंत्र वापरता येणार नाही. याचा अर्थ वाळू उत्खनन केवळ मजुरांमार्फत होणे गरजेचे आहे. शिवाय वाळू उपसा व वाहतूक रात्री करता येत नाही.असे असताना सर्व नियम धाब्यावर बसवत ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा कैक पटीने वाळू उपसा सर्रास केला जात होता. वाळूघाटात जेसीबीद्वारे उपसा होत असल्याची माहिती मिळताच बिलोली पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर धुमाळ यांच्या पथकाने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास गंजगाव वाळूघाट गाठला. येथे दोन जेसीबीद्वारे वाळू उपसा करण्यात येत असल्याचे दिसून आले.Conclusion: तसेच वाळूची वाहतूक करण्यासाठी सात ट्रक घाटात उभे असल्याचे आढळले. त्यात ए.पी. २५ एक्स ६८६९,ए.पी. १६ टी.यु. ८८७२, ए.पी. २५ टि.यु.०२४२, एम.एच. १२ एफ.एस. ६४२२, एम.एच. ४३ वाय ९२२२, एम.एच.१९ झेड. ६५००, एम.एच. २६- १५०७ या वाहनांचा समावेश होता. ही सर्व वाहने व दोन जेसीबी जप्त करुन बिलोली ठाण्यात आणण्यात आली. याप्रकरणी गंजगाव येथील वाळू ठेकेदार ठेकेदार प्रविण रेड्डी (साई शक्ती कन्स्ट्रक्शन, निझामाबाद), देवेंद्र रेड्डी (व्यवस्थापक), नवीन रेड्डी यांच्यासह वाहनांचे चालक व मालक अशा एकुण १६ जणांविरुद्ध पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव मष्णाजी वाडेकर यांच्या फिर्याद वरून कलम ३७९, १८८, ३४ भादंवि व गौण खनिज कायदा २०,२१ अन्वये बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.पोलिसांच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनाचे पितळ उघडे पडल्याची चर्चा परिसरात जोमात सुरू होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.