ETV Bharat / state

लग्नापूर्वीच नियोजित वधूवर अत्याचार; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लग्नाची तारीख जवळ येताच २ एकर शेती नावावर आणि २ लाख रुपयांची मागणी केली. वर आणि वराकडील मंडळींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडित नववधुने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व हकिकत सांगितली.

author img

By

Published : May 21, 2019, 4:11 PM IST

देगलूर पोलीस ठाणे

नांदेड - विवाह ठरलेल्या वधूवर विवाहापूर्वीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना देगलूर येथे घडली आहे. २ एकर शेती आणि २ लाख रुपये नावावर करुन दे, अशी अट नवरा आणि तिच्या कुटुंबियांनी वधूकडे केली होती.

देगलूर तालुक्यातील या मुलीचा विवाह तेलंगणातील बोधन तालुक्यातील युवकाशी ५ मे रोजी होणार होता. विवाहासाठी सर्व तयारी देखील करण्यात आली होती. लग्नाची संपूर्ण तयारी झाली असताना वराने नियोजित वधुचा विश्वास संपादन करुन तिच्यावर लग्नापूर्वीच अत्याचार केला. एवढेच नाही तर लग्नाची तारीख जवळ येताच २ एकर शेती नावावर आणि २ लाख रुपयांची मागणी केली. वर आणि वराकडील मंडळींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडित नववधुने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व हकिकत सांगितली.

नववधूने देगलूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन नियोजित वर, ३ महिलांसह एकूण ६ जणांविरुद्ध अत्याचार, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते करीत आहेत.

Intro:नांदेड - नियोजित वधुवर लग्नापूर्वीच अत्याचार, तीन महिलांसह सहा जणांविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

नांदेड : नियोजित वधूवर लग्नापूर्वीच अत्याचार करुन लग्न करण्यासाठी दोन एकर शेत आणि दोन लाख रुपये नावावर करुन दे अशी अट नियोजित वर आणि त्याच्या कुटुंबियांनी टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. Body:
या प्रकरणी देगलूर पोलिस ठाण्यात नियोजित पतीसह
सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देगलूर तालुक्यातील या मुलीचा विवाह तेलंगणातील
बोधन तालुक्यातील एका युवकाशी दि. पाच मे रोजी
होणार होता. लग्न निश्चित झाल्याने ही तरुणी आपल्या पुढील आयुष्याचे स्वप्न रंगवत होती. लग्नपत्रिका छापून,वाटपही झाले होते. लग्नाची संपूर्ण तयारी झाली असताना या वराने नियोजित वधुचा विश्वास संपादन करुन तिच्यावर लग्नापूर्वीच अत्याचार केला. एढेच नाही तर लग्नाची तारीख जवळ येताच दोन एकर शेती नावाची करुन दे आणि दोन लाख देण्याची मागणी वधू पक्षाकडे केली. वर आणि वराकडील मंडळींनी आपली फसवणूक केल्याचे
लक्षात येताच पिडीत नियोजित नववधुने पोलिस ठाणे गाठून पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. दरम्यान, नियोजित नववधूने देगलूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन या नियोजित वर आणि तीन महिलांसह सहा जणांविरुद्ध अत्याचार, फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.Conclusion:
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.