ETV Bharat / state

वेबसाईट हॅक करून 20 लाखांची खंडणी मागणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 6, 2020, 3:25 PM IST

वेबसाईट मालकाची वेबसाईट हॅक करून 20 लाखांची मागणी करणाऱ्यांविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सध्या त्याचा तपास वजीराबाद पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

नांदेड - वेबसाईट मालकाची वेबसाईट हॅक करुन 20 लाखांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही पोलिसांकडून संबंधिताला सहकार्य मिळाले नाही. या प्रकरणी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

शहरातील कैलासनगर भागात सोमेश झाडे यांनी स्वतःची डोमेन वेबसाईट कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून ते ऑनलाईन मार्केटिंग करत असत. या कंपनीला पुढे नेण्यासाठी त्यांचा एका विश्वासू ग्राहकांशी संपर्क आला. त्यांनी त्याला आपल्या कंपनीबद्दल माहिती सांगितली. शक्यतो वेबसाईटची कंपनी अनेकांना स्थापन करता येत नाही. सोमेश झाडे यांनी ते करून दाखवले. मित्राच्या माध्यमातून त्यांचा नाशिक येथील योगेश भट्ट यांच्याशी संपर्क आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन ग्लोन्साल्वीस यांच्याशी ओळख झाली. कंपनीत भागीदारी करण्यासाठी योगेश व ग्लेन हे दोघे सोमेश याला त्रासून सोडले होते. शेवटी सोमेश याने त्यांचे मित्रत्व तोडले.

हेही वाचा - चारचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू, गावकऱ्यांचा रास्ता रोको

मात्र, या दोघांनी या वेबसाईटचा डाटा चोरून स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या ऑनलाईन पद्धतीने उपयोग करत असल्याच सोमेश झाडे यांच्या लक्षात आले. त्या डाटाचा वापर करून सोमेश यांना 20 लाखांची मागणी करून या दोघे धमकी देत होते. पैसे नाही दिले तर तुझ्याविरोधातच पोलिसांत तक्रार देतो, असे म्हणून त्याला त्रासून सोडले.

या प्रकरणी झाडे यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांना पोलिसांकडून मदत मिळाली नाही. या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांनी दखल घेत हा तपास भाग्यनगर पोलीस निरीक्षकांच्या ऐवजी वजीराबाद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्याकडे सोपविला आहे.

हेही वाचा - तलवारीने हल्ला करत लुटले सोने, नांदेडला येत होते मित्र-मैत्रीण

Intro:नांदेड : वेबसाईटचा डाटा चोरून केली पैश्याची मागणी.
- नांदेडमध्ये गुन्हा दाखल.

नांदेड : वेबसाईट मालकाची साईट हॅक करुन २० लाखांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतरही पोलिसांकडून संबंधिताला सहकार्य मिळाले नाही. या प्रकरणी फसवणूक व माहिती
तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Body:शहरातील कैलासनगर भागात सोमेश झाडे यांनी स्वतःची डोमेन वेबसाईट कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून ते ऑनलाईन मार्केटींग करीत असत. या कंपनीला पुढे नेण्यासाठी त्यांचा एका विश्वासू ग्राहकाशी संपर्क आला.त्यांनी त्याला आपल्या कंपनीबद्दल माहिती सांगितली.शक्यतो वेबसाईटची कंपनी अनेकांना स्थापन करता येत नाही.सोमेश झाडे यांनी ते करुन दाखवले.मित्राच्या माध्यमातून त्यांचा नाशिक येथील योगेश भट्ट यांच्याशी संपर्क आला.त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन ग्लोन्साल्वीस यांच्याशी ओळख झाली. कंपनीत भागीदारी करण्यासाठी योगेश व ग्लेन हे दोघे सोमेश याला त्रासून सोडत. शेवटी सोमेश याने त्यांचे मित्रत्व तोडले. मात्र या दोघानी या वेबसाईटचा डाटा चोरुन स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या ऑनलाईन पद्धतीने उपयोग करत असल्याच सोमेश झाडे यांच्या लक्षात आले. त्या डाटाचा वापर करुन सोमेशला २० लाखाची मागणी करुन या दोघे धमकी देत होते.पैसे नाही दिले तर तुझ्याविरोधातच पोलिसांत तक्रार देतो, असे म्हणून त्याला त्रासून सोडले. Conclusion:
या प्रकरणी झाडे यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात
तक्रार दिली. त्याला पोलिसांकडून मदत मिळाली नाही.या प्रकरणाची पोलिस अधीक्षक यांनी दखल घेऊन हा तपास भाग्यनगर पोलिस पोलिस निरीक्षक यांच्या ऐवजी वजीराबाद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्याकडे सोपविला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.