नांदेड - लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे काम निमयानुसार करा, अन्यथा मला दहा लाख रुपये खंडणी द्या. खंडणी दिली नाही तर मी काम होऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्या एकावर इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज शिवभगत (रा. पावडेवाडी नाका, नांदेड), असे गुन्हा दाखल झालेल्या खंडणीबहाद्दराचे नावे आहे. प्रजासत्ताक पंकज समाजवादी भारत पक्षचा अध्यक्ष असून अहमदपूर येथे सुरू असलेल्या मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाचे बांधकामावर भेट दिली. त्यानंतर हे बांधकाम नियमानुसार होत नाही, असे म्हणत कंत्राटदाराला दहा लाखांची मागणी केली. जर पैसे दिले नाही तर मी काम होऊ देणार नाही, अशी धमकीही कंत्राटदाराला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा - आजपासून गुरुद्वारांच्या चौकी यात्रास सुरूवात; विविध कार्यक्रमांची रेलचेल
शासकीय कंत्राटदार मोहम्मद अब्बास मोहम्मद नजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा प्रकार 28 मार्च, 2019 ते 16 एप्रिल 2019 दरम्यान घडला. तरीही पंकजकडून सतत खंडणीची मागणी होत होती. अखेर पंकजच्या त्रासास कंटाळून अखेर कंत्राटदाराने इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पंकज शिवभगतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार