ETV Bharat / state

नांदेडमध्ये शेतीच्या वादातून भावाची हत्या, आरोपीला अटक

गंगाधर कर्णे यास कुऱ्हाडी, कत्ती व काठीच्या सहाय्याने डोक्यावर, कपाळावर, पायावर, छातीवर व पाठीत मारून गंभीर जखमी केले.

brother murdered brother in nanded
नांदेडमध्ये शेतीच्या वादातून भावाची हत्या, आरोपीला अटक
author img

By

Published : Apr 20, 2020, 11:52 AM IST

नांदेड - कुऱ्हाड व कत्तीच्या सहाय्याने आपल्या चुलत भावाचा शेतातच खून केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. देगलूर तालुक्यातील नरंगल येथे शेतीच्या वादातून ही घटना घडली. गंगाधर ईरन्ना कर्णे असे हत्या झालेल्याचे नाव आहे.

देगलूर तालुक्यातील नरगंल येथे कर्णे कुंटुबियात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीची वाद होता. रविवारी सकाळी गंगाधर इरन्ना कर्णे (लहान) हा शेतात वखरणी करावयास गेला होता. शेताच्या शेजारीच रहात असलेले गंगाधर इरन्ना कर्णे (मोठा), हणमन्लू इरन्ना कर्णे, रेखाबाई हणमन्लू कर्णे व गंगाबाई इरन्ना कर्णे यांनी गंगाधर कर्णे यास कुऱ्हाडी, कत्ती व काठीच्या सहाय्याने डोक्यावर, कपाळावर, पायावर, छातीवर व पाठीत मारून गंभीर जखमी केले. जखमीची पत्नी रेणुका गंगाधर कर्णे हिलाही मारहाण करण्यात आली व त्याच्या मुलास ही मारण्याची धमकी दिली. गंभीर जखमी झालेले गंगाधर कर्णे यास तातडीने उपजिल्हारुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

नांदेडमध्ये शेतीच्या वादातून भावाची हत्या, आरोपीला अटक

मृताची पत्नी रेणुका गंगाधर कर्णे हिच्या तक्रारीवरून उपरोक्त चार जणांवर देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान धबडगे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.