ETV Bharat / state

मुलांना भेटण्यास का येत नाहीस म्हणून प्रियकराने केला प्रेयसीचा खून - नांदेड यैेथे प्रियकराने केला प्रेयसीचा खून

पंकज आणि बबिता दोघेही मंगळवारी सकाळी दुचाकीने सुरदापूर येथून पालाईगुडा येथे जाण्यासाठी निघाले. वडोली शिवारातील मंदिराकडे जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर दुचाकी नेऊन पंकज याने मुलांना भेटण्याच्या कारणावरूनचा वाद उकरुन काढला. याचवेळी रागाच्या भरात त्याने तिचा निर्दयीपणे खून केला.

nanded crime news
आरोपी - पंकज जाधव
author img

By

Published : Jun 3, 2021, 2:16 PM IST

नांदेड - मुलांना भेटण्यास का येत नाहीस, या कारणावरुन प्रियकराने प्रेयसीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. किनवट तालुक्यातील पंकज जाधव याने प्रेयसी बबिता आडे हिचा खून केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नांदेड येथे प्रियकराने केला प्रेयसीचा खून

मुलांना भेटण्यावरून झाला होता वाद -

माहूर तालुक्याच्या पालाईगुडा येथील मूळ रहिवासी पंकज जाधव याचे बबिता आडे या महिलेशी प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधात असलेले पंकज आणि बबिता हे काही दिवसापूर्वी तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्याच्या नेरडगुंडा परिसरातील सुरदापूर येथे वास्तव्यास होते. मात्र पंकज जाधव यांचे मुलं मूळगावी किनवट तालुक्यातील पालिगुडा येथे राहत होते. पंकज ने बबिताकडे आपल्या मुलांना भेटण्यासाठी आग्रह केला होता, मात्र बबिता मुलांना भेटण्यास इच्छुक नव्हती. पंकजने त्याची प्रेयसी बबिताकडे मुलांना भेटण्याचा तगादा लावला होता. यावरून बबिता आणि पंकज यांच्यात वाद झाला. दररोज होणारा हा वाद विकोपाला गेला होता.

निर्दयीपणे खून केला -

दोघेही मंगळवारी सकाळी दुचाकीने सुरदापूर येथून पालाईगुडा येथे जाण्यासाठी निघाले. वडोली शिवारातील मंदिराकडे जाणाऱ्या निर्मनुष्य रस्त्यावर दुचाकी नेऊन पंकज याने मुलांना भेटण्याच्या कारणावरून वाद उकरुन काढला. याचवेळी रागाच्या भरात त्याने बबिता हिचे डोके दगडाने ठेचून तिचा निर्दयीपणे खून केला. या प्रकरणी किनवट पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पंकज याला माहूरच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी पंकजला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - आईवरून शिवीगाळ केल्याने भर रस्त्यात दगडाने ठेचून खून; घटना सीसीटिव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.