ETV Bharat / state

नांदेड मतदारसंघ : नांदेडमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला 'हात' मात्र, भाजपला दिली 'साथ'

author img

By

Published : May 25, 2019, 11:33 PM IST

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खुद्द खासदार चिखलीकर व त्यांचे मेव्हणे माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर व माजीमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांची भेट घेऊन आभार मानल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

नांदेड लोकसभा विश्लेषण

नांदेड - राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली तरी नांदेड जिल्ह्यात मात्र, या दोघांमध्ये एकीचे वातावरण नव्हते. प्रत्येक निवडणुकीदरम्यान अशोक चव्हाण आपली वेळ साधण्याचा प्रयत्न करतात. पण स्थानिक निवडणुकीत मात्र, त्यांना शह देण्यासाठी तयार असतात. हीच खेळी यावेळी काँग्रेसवर उलटली असून राष्ट्रवादीचे नेते जरी काँग्रेसच्या स्टेजवर असले तरी कार्यकर्ते मात्र भाजपच्या प्रचारात दिसून आले. राष्ट्रवादीने काँग्रेसला 'हात' देत भाजपला 'साथ' दिल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. त्यातच निवडणुकीनंतरही भाजपचे नूतन खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांनी गोरठेकर-कुंटुरकर कुटुंबाची भेट घेऊन आभारही मानले.

नांदेड लोकसभा विश्लेषण

जिल्ह्यातील राजकारण हे अशोक चव्हाण यांच्याभोवती फिरत आहे. प्रत्येक निवडणुकीत आजतागायत अशोक चव्हाण विरुद्ध इतर सर्व असाच सामना झाला आहे. त्यामुळे राज्यस्तरावर कितीही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी नांदेड जिल्ह्यात मात्र नेहमीच 'बिघाडी' झाल्याचे चित्र असते. लोकसभा निवडणुकी दरम्यान अशोकराव सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वाड्याचे उंबरठे झिजवून त्यांना मोठेपणा देतात. त्यांना मानणाऱ्या गटाची मते आपल्या पारड्यात कशी पडतील, याची राजकीय खेळी यशस्वीपणे पार पाडतात. इतर निवडणुकीत मात्र या नेत्यांना शह देण्याचीच भूमिका त्यांची राहिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांचा राग त्यांच्या मनात होता.

यावेळीही काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी करण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आले. काही सभांना उपस्थिती वगळता त्यांनी मात्र इतर अनेक सभांच्या ठिकाणी जाण्याचे टाळले. तर बापूसाहेब गोरठेकर यांचा बालेकिल्ला असणाऱ्या उमरी तालुक्यातून भाजपलाच मताधिक्य असून नायगाव विधानसभा मतदार संघातून एकवीस हजाराचे मताधिक्य आहे. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते माजी मंत्री गंगाधर देशमुख कुंटुरकर यांच्या कुंटुर सर्कलमध्येही भाजपलाच मताधिक्य आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी उघडपणे भाजपचा प्रचार केला. तसेच काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी उघड जरी नसला तरी जमेल तशी छुपी मदत चिखलीकर यांना बळ देणारी ठरली. त्यामुळे चिखलीकर यांची काँग्रेस-राष्ट्रवादीशी असणारी मैत्री त्यांच्या कामी आल्याची चर्चा आहे.

निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खुद्द खासदार चिखलीकर व त्यांचे मेव्हणे माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर व माजीमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांची भेट घेऊन आभार मानल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही अशोक चव्हाण विरुद्ध इतर सर्व असा सामना झाला तर नवल नाही.

Intro:नांदेडमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला 'हात' तर भाजपाला दिली 'साथ'.....
नांदेड: राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र या दोघांमध्ये विस्तवही आडवा जात नाही. प्रत्येक निवडणुकी दरम्यान अशोक चव्हाण आपली वेळ साधवण्याचा प्रयत्न करतात. पण स्थानिक निवडणूकीत मात्र त्यांना शह देण्यासाठी तयार असतात. हीच खेळी यावेळी काँग्रेसवर उलटली असून राष्ट्रवादीचे नेते जरी काँग्रेसच्या स्टेजवर असले तरी कार्यकर्ते मात्र भाजपच्या प्रचारात दिसून आले. राष्ट्रवादीने काँग्रेसला 'हात' देत भाजपाला 'साथ' दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यातच निवडणूकीनंतरही भाजपाचे नूतन खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी गोरठेकर-कुंटुरकर कुटुंबाची भेट घेऊन आभारही मानले.Body:नांदेडमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला 'हात' तर भाजपाला दिली 'साथ'.....
नांदेड: राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली तरी जिल्ह्यात मात्र या दोघांमध्ये विस्तवही आडवा जात नाही. प्रत्येक निवडणुकी दरम्यान अशोक चव्हाण आपली वेळ साधवण्याचा प्रयत्न करतात. पण स्थानिक निवडणूकीत मात्र त्यांना शह देण्यासाठी तयार असतात. हीच खेळी यावेळी काँग्रेसवर उलटली असून राष्ट्रवादीचे नेते जरी काँग्रेसच्या स्टेजवर असले तरी कार्यकर्ते मात्र भाजपच्या प्रचारात दिसून आले. राष्ट्रवादीने काँग्रेसला 'हात' देत भाजपाला 'साथ' दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यातच निवडणूकीनंतरही भाजपाचे नूतन खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी गोरठेकर-कुंटुरकर कुटुंबाची भेट घेऊन आभारही मानले.

जिल्ह्यातील राजकारण हे अशोक चव्हाण यांच्याभोवती फिरते आहे. प्रत्येक निवडणुकीत आजतागायत अशोकराव विरुद्ध इतर सर्व असाच सामना झाला आहे. त्यामुळे राज्यस्तरावर कितीही काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तरी नांदेड जिल्ह्यात मात्र नेहमीच 'बिघाडी' झाल्याचे चित्र असते. लोकसभा निवडणुकी दरम्यान अशोकराव सर्व राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वाड्याचे उंबरठे झिजवून त्यांना मोठेपणा देतात. त्यांना मानणाऱ्या गटाची मते आपल्या पारड्यात कशी पडतील याची राजकीय खेळी यशस्वीपणे पार पाडतात. इतर निवडणुकीत मात्र या नेत्यांना शह देण्याचीच भूमिका त्यांची राहिली आहे. त्यामुळे अनेक दिवसांचा राग त्यांच्या मनात होता.
यावेळीही काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी करण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आले. काही सभांना उपस्थिती वगळता त्यांनी मात्र इतर अनेक सभांच्या ठिकाणी जाण्याचे टाळले. तर बापूसाहेब गोरठेकर यांचा बालेकिल्ला असणाऱ्या उमरी तालुक्यातून भाजपालाच मताधिक्य असून नायगाव विधानसभा मतदार संघातून एकवीस हजाराचे मताधिक्य आहे. तसेच राष्ट्रवादीचे जेष्ठनेते माजी मंत्री गंगाधरराव देशमुख कुंटुरकर यांच्या कुंटुर सर्कल मध्येही भाजपालाच मताधिक्य आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी उघडपणे भाजपाचा प्रचार केला. तसेच काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी उघड जरी नसला तरी जमेल तशी छुपी मदत चिखलीकर यांना बळ देणारी ठरली. त्यामुळे चिखलीकर यांची कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी असणारी मैत्री त्यांच्या कामी आल्याची चर्चा आहे.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खुद्द खा. प्रताप पाटील चिखलीकर व त्यांचे मेहुणे माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. बापूसाहेब गोरठेकर व माजीमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांची भेट घेऊन आभार मानल्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही अशोकराव विरुद्ध इतर सर्व असा सामना झाला तर नवल नाही.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.