नांदेड - अजित पवार यांची घेतलेली भेट सदिच्छा होती, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले आहे. तसेच दोन राजकीय नेते भेटल्यावर 'चर्चा तर होणारच',असे वक्तव्य त्यांनी केले.
आज सकाळी भाजपचे खासदार चिखलीकर यांनी मुंबईत अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यानंतर जिलह्यात राजकीय चर्चांना उधाण आले होते.
यानंतर चिखलीकर नांदेडमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, 'भेटीत चर्चा होतच असते', असे सांगितल्याने राजकीय वर्तुळात ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे.