नांदेड - शीख समाजाचे गुरू गोविंदसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने नांदेडच्या गुरुद्वारात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. श्री गुरू गोविंदसिंह यांच्या प्रकाशपर्वा निमित्ताने आज (दि. 20 जाने.) गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जयंती निमित्त नगर किर्तनाचे आयोजन
शीख धर्मियांचे दहावे धर्मगुरु श्री गुरू गोविंद सिंह यांच्या जयंती निमित्त शहरातील सचखंड गुरुद्वारा परिसर फुलला आहे. शिख धर्मियांसाठी नांदेड हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. हा प्रकाशपर्व मोठ्या उत्साहाने साजरे कारण्यात येत आहे. या कार्यक्रमानिमित्त तख्त साहिब येथे धार्मिक परंपरे नुसार सकाळी पहाटेपासून पूजा केली जाते. त्यासोबतच सायंकाळी चार वाजता नगर किर्तन आयोजित केले जाते.
सेवाभावी संघटनांकडून रक्तदान
जयंतीच्या निम्मीताने सेवाभावी संघटनांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि. 20 जाने.) विशेष करून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात अनेक युवक आणि भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
हेही वाचा - नवरदेवाने लग्नात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना दिले हेल्मेट भेट