ETV Bharat / state

राष्ट्रवादीला राम राम करणाऱ्या बापूसाहेब गोरठेकरांच्या प्रवेशाचा मुहुर्त अखेर ठरला

बापूसाहेब गोरठेकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते, असे बोलले जात आहे.

author img

By

Published : Aug 22, 2019, 8:10 PM IST

Updated : Aug 22, 2019, 8:49 PM IST

बापूसाहेब गोरठेकर

नांदेड - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून बाहेर पडलेले जिल्ह्यातील एक वजनदार नेते तथा माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या भाजप प्रवेशासाठी येत्या ३० तारखेचा मुहूर्त ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ३० तारखेला नांदेड जिल्ह्यात येत आहे. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर येथे गोरठेकरांचा पक्ष प्रवेश सोहळा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बापूसाहेब गोरठेकर

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या संकटामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला होता. त्यानंतर आता महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा बुधवारपासून (२१ ऑगस्ट) सुरू झाला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. ३० ऑगस्टला महाजनादेश यात्रा नांदेड जिल्ह्यात येणार आहे. दरम्यान, या निमित्ताने गोरठेकर यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा आयोजित करण्यासाठी खासदार प्रताप पाटील-चिखलीकर तयारीला लागले आहेत.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भोकर विधानसभा मतदारसंघातून बापूसाहेब गोरठेकर यांना भाजपची उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर गोरठेकरांचा प्रवेश सोहळा महत्त्वाचा समजला जातो. हा पक्ष प्रवेश सोहळा भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या मार्गावर राहील असे ठिकाण निवडावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे कळते. त्यानुसार नांदेड किंवा अर्धापूर या दोन ठिकाणांचा विचार करण्यात आला असला तरी अर्धापुरातच हा सोहळा निश्चित होण्याची शक्यता आहे.

पक्ष प्रवेश सोहळ्याच्या अनुषंगाने चिखलीकर आणि गोरठेकर सोमवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सायंकाळी किंवा रात्री उभय नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम अंतिम करणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा पराभव केल्यानंतर भाजपने आता जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. भोकर मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित समजून स्वतः अशोक चव्हाण भोकरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार त्यांनी गेल्या काही दिवसांपासून भोकरमध्ये संपर्क दौरे सुरू केले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील चव्हाण यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची रणनिती भाजपने आखली आहे.

गोरठेकर यांच्या प्रभाव क्षेत्रातील उमरी व धर्माबाद हे २ तालुके नायगाव विधानसभा मतदारसंघात जात असले तरी मतदारसंघांच्या पुनर्रचने आधी भोकर मतदारसंघच गोरठेकर घराण्यासाठी हक्काचा होता. त्यामुळे या वेळी गोरठेकरांना भोकरमधून उभे करुन अशोक चव्हाणांपुढे तगडे आव्हान उभे करण्याचा भाजपचा विचार आहे. दरम्यान ३० तारखेला अर्धापूर येथे होणाऱ्या गोरठेकरांच्या पक्ष प्रवेश साहळ्याच्या निमित्ताने विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ आणि त्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी देखील भाजपकडून केली जात आहे.

Intro:राष्ट्रवादीला राम राम करणाऱ्या बापूसाहेब गोरठेकरांच्या प्रवेशाचा मुहुर्त अखेर ठरला.....!

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून बाहेर पडलेले जिल्ह्यातील एक वजनदार नेते तथा माजी आ . बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या भाजप प्रवेशासाठी येत्या २९ तारखेचा मुहूर्त ठरला आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २९ रोजी नांदेड जिल्ह्यात येत आहे . त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर येथे गोरठेकरांचा पक्ष प्रवेश सोहळा होईल अशी माहिती सूत्रांकडून आहे.Body:राष्ट्रवादीला राम राम करणाऱ्या बापूसाहेब गोरठेकरांच्या प्रवेशाचा मुहुर्त अखेर ठरला.....!

नांदेड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम ठोकून बाहेर पडलेले जिल्ह्यातील एक वजनदार नेते तथा माजी आ . बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या भाजप प्रवेशासाठी येत्या २९ तारखेचा मुहूर्त ठरला आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा २९ रोजी नांदेड जिल्ह्यात येत आहे . त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर येथे गोरठेकरांचा पक्ष प्रवेश सोहळा होईल अशी माहिती सूत्रांकडून आहे.

सांगली - कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या संकटामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात बदल करावा लागला होता. त्यानंतर आता महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा बुधवारपासून ( दि . २१ ऑगस्ट ) सुरु झाला आहे . मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.
२९ ऑगस्टला महाजनादेश यात्रा नांदेड जिल्ह्यात येणार आहे. दरम्यान या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील बडे नेते बापुसाहेब गोरठेकर यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा आयोजित करण्यासाठी खा. प्रताप पाटील चिखलीकर तयारीला लागले आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघातून बापुसाहेब गोरठेकर यांना भाजपची उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर गोरठेकरांचा प्रवेश सोहळा महत्वाचा समजला जातो. हा पक्ष प्रवेश सोहळा भोकर मतदारसंघातील अर्धापूर येथे होणार आहे. महाजनादेश यात्रेच्या मार्गावर राहील असे ठिकाण निवडावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे कळते.
त्यानुसार नांदेड किंवा अर्धापूर या दोन ठिकाणांचा विचार करण्यात
आला असला तरी अर्धापुरातच हा सोहळा निश्चित होण्याची शक्यता आहे. २९ तारखेच्या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या अनुषंगाने खा . प्रताप पाटील चिखलीकर आणि बापूसाहेब गोरठेकर सोमवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले. मंगळवारी मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर सायंकाळी किंवा रात्री उभय नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्ष प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम अंतिम करणार असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा पराभव केल्यानंतर भाजपने आता जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी व जोरदार तयारी सुरु केली आहे . भोकर मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित समजून स्वतः अशोक चव्हाण भोकरमधून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येते. त्यानुसार त्यांनी गेल्या काही दिवसांपासून भोकरमध्ये संपर्क दौरे सुरु केले आहेत . परंतु लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील अशोक चव्हाण यांना मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची रणनिती भाजपने आखली आहे. बापुसाहेब गोरठेकर यांच्या प्रभाव क्षेत्रातील उमरी व धर्माबाद हे दोन तालुके नायगाव विधानसभा मतदारसंघात जात असले तरी मतदारसंघांच्या पुनर्रचने आधी भोकर मतदारसंघच गोरठेकर घराण्यासाठी हक्काचा होता. त्यामुळे या वेळी गोरठेकरांना भोकरमधून उभे करुन अशोक चव्हाणांपुढे तगडे आव्हान उभे करण्याचा भाजपचा विचार आहे.
दरम्यान २९ तारखेला अर्धापूर येथे होणाऱ्या बापुसाहेब गोरठेकरांच्या पक्ष प्रवेश साहळ्याच्या निमित्ताने विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ आणि त्यासाठी शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी देखील भाजपकडून केली जात आहे.Conclusion:
Last Updated : Aug 22, 2019, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.