नांदेड : बोधडी येथील भाविक तेलंगणातील आडेली देवीच्या दर्नासाठी जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटून (autorickshaw overturned) दोघांचा जागीच मृत्यू (two killed in Nanded) झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात (Autorickshaw Accident Nanded) किनवट तालुक्यातील शिवणी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या झळकवाडी गावाजवळील घाटात मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास झाला. Nanded latest news , Nanded Crime
भरधाव रिक्षा उलटली- बोधडी, ता. किनवट येथील भाविक दिनांक १ रोजी तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील आडली देवीच्या दर्शनाला रिक्षातून जाताना जलधरा ते झळकवाडी मार्गावर असणाऱ्या झळकवाडी येथील उतार असलेल्या घाटात चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. या अपघातात बालाजी पांडुरंग खोकले (१९) व नागेश रामा टारपे (२०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून इतर जखमी झाले आहेत. त्यांना शिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. ऑटो चालक गणेश गवळे, सुनील रामा टारपे, विशाल चंद्रकांत टारपे, विजय सुरेश टारपे, शंकर डुकरे, वसंत डुकरे, मारुती बोंबले या जखमींवर उपचार करण्यात आले व नंतर हिमायतनगर येथे हलविण्यात आले आहे.
घटनेचा तपास सुरू - या घटनेची माहिती कळताच इस्लापूरचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत, सहायक पोलीस उपनिरीक्षक ए.एस. शेख व बीट आमदार संदीप साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.