ETV Bharat / state

‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत सर्व कार्यालयातील उपस्थिती आता ५० टक्के - नांदेड विद्यापीठ लेटेस्ट न्युज

परीक्षा विभाग व विभागाच्या कामकाजा संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळता हा नियम इतर सर्वांना लागू आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी -संचालकांनी अथवा प्राचार्यांनी आपल्या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे ५० टक्के उपस्थितीचे नियोजन करावे. जे कर्मचारी घरी थांबणार आहेत त्यांना (वर्क फ्रॉम होम) करिता कामाचे नियोजन करावे. असे ही शासनाने स्पष्ट केले आहे.

रामानंद विद्यापीठ
रामानंद विद्यापीठ
author img

By

Published : Mar 19, 2021, 9:15 PM IST

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये, विद्यापीठ परिसर कार्यालयातील उपस्थिती आता ५० टक्के करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्णय जारी केला आहे. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने हा नियम लागू केला आहे. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती ३१ मार्च पर्यंत ५० टक्के करण्यात आली आहे.

वर्क फ्रॉम होमचा सल्ला
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानूसार (वर्क फ्रॉम होम) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा, लेखी परीक्षा विद्यापीठाच्या विहित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.

यांना असेल नियम लागू
विद्यापीठाशी संलग्नीत महविद्यालये, विद्यापीठ परिसरातील सर्व शैक्षणिक संकुले, प्रशासकीय विभाग, लातूर येथील उपपरिसर, हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेज आणि किनवट येथील कै. श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र, इत्यादींना हा नियम लागू करण्यात येणार आहे. परीक्षा विभाग व विभागाच्या कामकाजा संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळता हा नियम इतर सर्वांना लागू आहे. त्यानुसार विभाग प्रमुखांनी -संचालकांनी अथवा प्राचार्यांनी आपल्या विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे ५० टक्के उपस्थितीचे नियोजन करावे. जे कर्मचारी घरी थांबणार आहेत त्यांना (वर्क फ्रॉम होम) करिता कामाचे नियोजन करावे, असे ही शासनाने स्पष्ट केले आहे.

त्रिसूत्रीचा वापर करावा
महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचे पालन करावे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्याकरिता प्रत्येकांनी मास्क वापरावा, सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. शिवाय सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी केले आहे.

हेही वाचा-कोरोना कहर.. खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती, सरकारचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.