ETV Bharat / state

Video : पोलीस उपनिरीक्षकाला पाठलाग करून धक्काबुक्की; मुदखेडमध्ये जमावाचा हैदोस

नांदेडमधील मुदखेड येथे पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला भर बाजारपेठेत शिवीगाळ करण्यात आल्याने मुदखेडमध्ये खळबळ उडाली आहे

पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे
author img

By

Published : Mar 22, 2019, 12:00 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील मुदखेड येथे पोलीस उपनिरीक्षकाला भर रस्त्यात शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार समोर आला आहे. मुदखेड येथील बाजारात जमावाने अक्षरशः धुडगूस घातला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर नांदेडमध्ये पोलिसांचा धाक राहिला नसल्याची जोरदार चर्चा आहे.

पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या मागे लागलेला जमाव

पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला भर बाजारपेठेत शिविगाळ करण्यात आल्याने मुदखेडमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस ठाणे जवळ असल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा मुदखेडमध्ये काहीही घडले असते, अशी चर्चा होत आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी परवा अवैध कत्तलखाना चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. त्या रागातुन कुरेशी गटाने पोलीस उपनिरीक्षकाला एकटे पाहुन त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याचा व्हिडीओ व्हायरल होऊनही पोलिसांनी मारहाण करणाऱ्या टोळक्यावर काहीही कारवाई केलेली नाही. राजकीय दबावातून पोलीस शांत बसल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मुदखेड पोलीस सध्या प्रचंड मानसिक दडपणाखाली आहेत. या सगळ्या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावी, अशी मागणी होत आहे.

Intro:नांदेड: मुदखेड़ मध्ये पोलीस उपनिरिक्षकाला धक्काबुक्की, भर बाजारात पोलिस उपनिरीक्षकाच्या मागे लागत केली शिविगाळ, दिवसाढवल्या जमावांने मुदखेड़ शहरामध्ये घातला हैदोस.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड़ इथल्या पोलीस उपनिरीक्षकाचा एक धक्कादायक वीडियो वायरल झालाय. या वीडीओ मध्ये काही लोक चक्क पोलिस उपनिरीक्षकालाच भर रस्त्यात अड़वत धक्काबुक्की करतायत .Body:
पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका-याला बाजारपेठेत शिविगाळ करण्यात येतेय. इतकच नाही तर हा जमाव पोलिस निरीक्षकाच्या मागे ही लागला होता. पोलिस ठाणे जवळ असल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा मुदखेड़ मध्ये काहीही घडल असत अशी चर्चा होतेय. दरम्यान पोलिस उप निरीक्षक नारायण शिंदे यांनी परवा अवैध कत्तलखाना चालवणा-यांवर गुन्हा दाखल केला होता.त्या रागातुन कुरेशी गटाने पोलिस उपनिरीक्षकाला एकट पाहुन त्यांना धक्काबुककी , शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिलीय. याचा Vdo वायरल होऊनही पोलिसांनी मारहाण करणाऱ्या टोळक्यावर काहीही कारवाई केलेली नाही.Conclusion:राजकीय दबावातून पोलिस शांत बसल्याची धक्कादायक माहिती मिळतेय. या घटनेमुळे मुदखेड़ पोलिस सध्या प्रचंड मानसिक दड़पणाखाली आहेत. या सगळ्या प्रकाराकडे वरिष्ठानी लक्ष द्यावी अशी मागणी होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.