ETV Bharat / state

अशोकराव चव्हाणांनी शेतकऱ्यांचे पालकत्व विसरू नये - प्रल्हाद इंगोले - FRP arrears Nanded

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पालकत्व विसरू नये, त्यांना पेरणीसाठी वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यासाठी थकीत एफआरपी देण्यास कारखान्यांना निर्देशित करावे, अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली.

FRP arrears demand Pralhad Ingole
एफआरपी थकित रक्कम मागणी प्रल्हाद इंगोले
author img

By

Published : Jun 15, 2021, 3:15 PM IST

नांदेड - पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मोठमोठे रस्त्यांचे कामे, पुलांची कामे यांनाच प्राधान्य देवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पालकत्व विसरू नये, त्यांना पेरणीसाठी वेळेवर पैसे उपलब्ध करून देण्यासाठी थकीत एफआरपी देण्यास कारखान्यांना निर्देशित करावे, अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केली.

माहिती देताना शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले

हेही वाचा - केंद्राने जाहीर केलेल्या हमी भावाचा लाभ शेतकर्‍यांना वेळेत मिळवून द्यावा - आमदार रातोळीकर

यंदा मान्सून वेळेवर येऊन पेरणीयोग्य पाऊस झाला, परंतु साखर कारखान्यांनी एफआरपीचे पैसे न दिल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी सावकाराच्या दारात जावे लागत आहे. बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्य प्रवर्तक असलेल्या भाऊराव चव्हाण साखर कारखान्यानेच एफआरपी थकवल्याने इतर कारखानेही शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत, अशी माहिती प्रल्हाद इंगोले यांनी दिली.

आघाडीचे सरकार आहे, हे विसरून आंदोलन करू

शेतकऱ्यांच्या मागणीकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केले तर राज्यात आघाडीचे सरकार आहे, हे विसरून शेतकरी कारखान्यावर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करतील. याची जाणीव सत्ताधारी मंडळींनी ठेवावी, अशी अपेक्षाही इंगोले यांनी व्यक्त केली.

....तर स्वतःला कोंडून घेऊ

शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात गेले होते. मात्र, येथे अधिकारी उपस्थित नसल्याने शिष्टमंडळाने दोन तास ठिय्या देऊन उपसंचालकांच्या खुर्चिला निवेदन दिले. कार्यालय अधिकारी वाडेकर आले असता त्यांना घेराव घालून आपल्या मागण्या मांडल्या व २० तारखेपर्यंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम दिली नाही तर त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात स्तवत:ला कोंडून घेऊन आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला.

...यांनी दिले निवेदन

निवेदनावर शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले, सरपंच बालाजी पाटील भायेगावकर, तुकाराम माचनवाड, नागोराव घार्गे, विश्वंभर माचनवाड, दत्ता बुचडे, दत्ता गुंडे, बालाजी कुकुर्ले, एकनाथ माचेवाड माधव राहिरे, सीताराम गव्हाणे, दिगंबर कुकुर्ले, संजय गव्हाणे, बालाजी गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विष्णूपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला...!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.