ETV Bharat / state

Ashok Chavan React on Pankaja Munde Upset अशोक चव्हाण म्हणाले किमान पंकजा मुंडेंचे तरी नीट ऐकावे, ही अपेक्षा - Ashok Chavan Said

माजी मंत्री आणि काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना पंकजा यांच्या वक्तव्याला अनुसरून वक्तव्य केले आहे. तुम्ही आमचे ऐका किंवा ऐकू नका किमान पंकजा मुंडे यांचे तरी नीट ऐकावे अशी अपेक्षा आहे असे अशोक चव्हाण भाजपला उद्देशून म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांनी नुसते मोबाईलवर न बोलता प्रत्यक्ष कृती करून काम करावे. Former Minister Ashok Chavan BJP leader Pankaja Munde Ashok Chavan Criticize on CM Eknath Shinde

Former Minister Ashok Chavan
माजी मंत्री आणि काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण
author img

By

Published : Aug 13, 2022, 9:22 AM IST

नांदेड महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप नेत्या पंकजा मुंडे ( BJP leader Pankaja Munde ) यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा असतानाच, काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अशोक चव्हाण ( Former Minister Ashok Chavan ) यांनी पंकजा यांच्या वक्तव्याला अनुसरून वक्तव्य केले आहे. तुम्ही आमचे ऐका किंवा ऐकू नका, किमान पंकजा मुंडे यांचे तरी नीट ऐकावे अशी अपेक्षा आहे असे अशोक चव्हाण भाजपला उद्देशून म्हणाले. ( Ashok Chavan Criticize on CM Eknath Shinde )

नाराज पंकजा मुंडेंचे वक्तव्य : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी चेहरा असलेल्या आणि मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात महिला व बालकल्याण मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांना एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. याबद्दल विचारले असता त्यांनी थेट नाराजी व्यक्त न करता त्यांनी टोला लगावला. कदाचित माझी पात्रता नसल्याने मंत्रिपद दिले नसेल असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकवाक्यता नाही अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील नवीन शिंदे सरकार स्थिर नसून, निर्णय प्रक्रियांनाही विलंब केला जात आहे. मागच्या महाविकास आघाडी सरकारमधील निर्णयांना स्थगिती दिली जाते आहे. तर नवीन निर्णय घेतले जात नाहीत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी 40 दिवस लागल्यानंतर, पालकमंत्र्यांची अजून नियुक्ती नाही. शिवाय खातेवाटपाचा पत्ता नाही. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे हे चित्र आहे.

नुसते मोबाईलनवरून बोलून चालणार नाही, तर कृती करा नुसते मोबाईलवरून बोलू नका, तर आदेश कृतीत उतरवा. अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला. अतिवृष्टीने महाराष्ट्रात फार विदारक अवस्था असून, मुख्यमंत्री नांदेडला येतात. पण, शेतकऱ्यांकडे जात नाहीत, हे काही योग्य नाही. पण, मुख्यमंत्र्यांनी नुसते मोबाईल फोनवरून बोलून चालणार नाही, तर त्यांचे आदेश कृतीत उतरवणेदेखील गरजेचे आहे. नाहीतर त्यांचे हे बोलणं मोबाईलपुरतेच मर्यादित राहील, असा खोचक टोला माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

अजून कोणताच निर्णय नाही काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते. यावर अशोक चव्हाण म्हणाले की, असा कोणताही निर्णय झालेला नाही. कालच मविआच्या समन्वय समितीची बैठक झाली. पण, त्यात असा कोणताही विषय आला नाही. त्यामुळे असा काही विषयच झाला नाही.

हेही वाचा Har Ghar Tiranga Initiative Pune हर घर तिरंगा मोहीम पुणे महापालिकेकडून फसली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.