नांदेड - केवळ जात आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप-शिवसेना सरकारने गेल्या 5 वर्षांत केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे. मुदखेड तालुक्यातील डोनगाव, येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
हेही वाचा - भोकर मतदारसंघात दीर्घकाळानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे मनोमिलन
यावेळी चव्हाण म्हणाले, शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक गेल्या पाच वर्षात या सरकारला करता आले नाही. केवळ भावनेला हात घालून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम यांनी केले आहे. कोळी, धनगर, मुस्लीम या समाजासाठी सरकारने काय केले, असा आरोप करून चव्हाण म्हणाले की, कर्जमाफी, मेगाभरती, पीकविमा याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही.
हेही वाचा - 'काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळेच मोदी पंतप्रधान' - असुदुद्दीन ओवैसी