नांदेड - एका मंत्र्याचा जावई गांजाची तस्करी करताना आढळून आला. मात्र तो मंत्री म्हणतो की हा गांजा नसून हर्बल तंबाखू आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तुमचा मंत्री हर्बल तंबाखू पिकवू शकतो तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या. म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नवाब मलिकांवर केली आहे.
देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. यावेळी फडणवीस यांनी कुंडलवाडी ता. बिलोली प्रचारसभेत बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडीतील लोक कशात भ्रष्टाचार करतील याचा नेम नाही. जमेल त्यात खात आहेत, असेही आरोप त्यांनी केले.
बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं म्हणून सांगतील.!
प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा लाख लोकांना घरं दिली. गॅस सिलिंडर मिळालं पाहिजे. राज्य सरकारनं गरिबाला एकही घर दिलं नाही. फक्त छपाई आणि पैसे कमावण्याचा उद्योग सुरु आहे. आयकर खात्याच्या धाडीत हजारो कोटी सापडले आहेत. ते जमा करताना सगळा हिशेबही ठेवला असेही फडणवीस म्हणाले.
अतिवृष्टीने पीडित शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत नाही
अतिवृष्टीत शेतीचं मोठं नुकसान झालं पण या सरकारने रुपयांची मदत केली नाही. मंत्री बांधावर जातात, मोठ्या घोषणा करतात. पण शेतकऱ्यांना कसली मदतही नाही आणि पीक विम्याचे पैसेही मिळत नाहीत. हे इतके लबाड आहेत की काहीही झालं की केंद्रावर ढकलतात. बायकोनं मारलं तरी केंद्रानं मारलं असं सांगतील, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.
हेही वाचा - नवाब मलिक यांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता मी पुढची कथा सांगेन - संजय राऊत