ETV Bharat / state

जिल्हा परिषदेत चारही सभापती काँग्रेसचेच; राष्ट्रवादीच्या हाती भोपळा....!

author img

By

Published : Feb 4, 2020, 8:30 AM IST

जिल्हा परिषद नांदेडच्या चारही सभापतीपदांवर काँग्रेसच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये उपसभापतीपद हे शिवसेनेला गेले मात्र, राष्ट्रवादीला त्यातील एकही सभापतीपद न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

जिल्हा परिषद नांदेडमध्ये चारही सभापती काँग्रेसचेच
जिल्हा परिषद नांदेडमध्ये चारही सभापती काँग्रेसचेच

नांदेड - जिल्हा परिषदेच्या चारही सभापतीपदांची बिनविरोध निवड झाली आहे. ही चारही पदे काँग्रेसने खिशात घातली आहेत. समाजकल्याण सभापतीपदी रामराव नाईक, महिला बाल कल्याणच्या सभापतीपदी सुशीला बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब रावणगावकर आणि संजय बेळगे यांची विषय समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. यानंतर काँग्रेसने डाव साधला आहे, अशी चर्चा आहे. १० सदस्य असूनही सत्तेत स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या हाती भोपळा आल्याचे चित्र आहे. शिवसेनेला उपाध्यक्षपद देऊन खूश केले असले तरी, सभापती पद मात्र मिळू शकले नाही.

जिल्हा परिषद नांदेडमध्ये चारही सभापती काँग्रेसचेच

महाआघाडी सत्तेत असलेल्या काँग्रेसने ही चारही सभापती पदे स्वतःकडे ठेवली आहेत. मागील १५ वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबत किंबहुना जिल्ह्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या तालमीत राहून कठीण वेळी काँग्रेसला लहान भावाप्रमाणे साथ दिली. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी असो किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत असो राष्ट्रवादीने काँग्रेस पार्टीला वेळोवेळी साथ दिली. मात्र, काँग्रेसने आज गोरठेकर, कुंटूरकर, पाठोपाठ नाईक व धोंडगे गटाचाही केसाने गळा कापला, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उमटत आहे.

जिल्हा परिषदेच्या सभापती व विषय समितीच्या निवड प्रक्रियेत महाविकास आघाडीचा अजेंडा ठरल्यानंतरही राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या गटातील जिल्हा परिषद सदस्याला सभापती पदापासून दूर ठेवण्याची कूटनीती सोमवारी झालेल्या सभापती निवडीच्या वेळेस बघायला मिळाली.

हेही वाचा - नांदेडमध्ये टायर फुटून कार पलटल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी

नांदेड लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेशी जवळीक केल्याची चर्चा ताजी असताना काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत पूर्वी ठरलेल्या सभापतीपदाच्या शब्दाला न पाळता चारही पदे आपल्याकडे ठेऊन घेतली. यामुळे, नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे. तर, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना ही खेळी करण्यासाठी जवळच्यांनी डोस पाजल्याची चर्चा जिल्हा परिषद परिसरात होती. परिणामी आघाडीत बिघाडी झाल्याने आगामी जिल्हा बँक व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत याचे पडसाद दिसून येतील असे दिसते.

हेही वाचा - नांदेड : शिक्षकाकडून अश्लील चित्रफीत दाखून तिसरीतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Intro:जिल्हा परिषदेत चारही सभापती काँग्रेसचेच; राष्ट्रवादीच्या हाती भोपळा....! Body:जिल्हा परिषदेत चारही सभापती काँग्रेसचेच; राष्ट्रवादीच्या हाती भोपळा....!

नांदेड: जिल्हा परिषदेच्या चारही सभापतीपदांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेसने डाव साधला असून समाजकल्याण सभापती पदी रामराव नाईक, महिला बाल कल्याणच्या सभापतीपदी सुशीला बेटमोगरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर बाळासाहेब रावणगावकर आणि संजय बेळगे यांची विषय समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. महाआघाडी सत्तेत असलेल्या काँग्रेसने हे चारही सभापती पदे स्वतः कडे ठेवलीत. तर दहा सदस्य असूनही सत्तेत स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती भोपळा आल्याचे चित्र आहे. शिवसेनेला उपाध्यक्ष पद देऊन खुश केले असले तरी सभापती पद मात्र मिळू शकले नाही.

मागील पंधरा वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबत किंबहुना जिल्ह्याचे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या तालमीत राहून कठीण वेळी काँग्रेसला लहान भावाप्रमाणे साथ दिली आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी असो किंवा विधान परिषदेच्या निवडणुकीत असो राष्ट्रवादीने काँग्रेस पार्टीला वेळोवेळी साथ दिली. मात्र त्याच काँग्रेसने आज गोरठेकर, कुंटूरकर, पाठोपाठ नाईक व धोंडगे गटाचाचा ही केसाने गळा कापला गेला अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याकडून उमटत आहे.
जिल्हा परिषदेच्या सभापती व विषय समितीच्या निवड प्रक्रियेत महाविकास आघाडीचा अजेंडा ठरल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या गटातील जि. प. सदस्याला सभापती पदापासून दूर ठेवण्याची कूट नीती आज झालेल्या सभापती निवडीच्या वेळेस बघायला मिळाली.
नांदेड लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेशी जवळीक केल्याची चर्चा ताजी असताना काँग्रेसने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोबत पूर्वी ठरलेल्या सभापतीपदाच्या शब्दाला न पाळता चारही सभापती ची पदे आपल्याकडे ठेवल्याने नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यातील मैत्रीत दुरावा निर्माण झाला असून बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना ही खेळी करण्यासाठी जवळच्यानी डोस पाजल्याची चर्चा जिल्हा परिषद परिसरात होती.परिणामी आघाडीत बिघाडी झाल्याने आगामी जिल्हा बँक व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत याचे पडसाद दिसून येतील असे दिसते
____________________

अजित पवार यांचा फोन उचलला नाही...
महाविकास आघाडीत सत्तेत वाटा देण्यात यावा म्हणून राष्ट्रवादीच्या लोहा, किनवट मतदार संघाच्या नेत्यांनी भ्रमणध्वनीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संपर्क करून सुरू असलेली खेळी लक्षात आणून दिली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दादा नी काँग्रेस नेत्याला फोन ही केला मात्र त्यांनी फोन न घेतल्याने कार्यकर्ते अधिकच चिडले होते
__________________
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भरण्यात आलेले नामनिर्देशनपत्र परत....!
महाविकास आघाडीतील नेत्यात झालेल्या सत्ता वाटपाच्या चर्चेनंतर पक्षातील नेत्यांच्या सांगण्या वरून जिपचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी विविध सभापती पदा साठी तीन अर्ज दाखल केले होते, मात्र नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आपले नामनिर्देशनपत्र परत घेतले याविषयी समाधान जाधव यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की मला पक्षाने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते व नंतर परत घेण्याचीही सांगण्यात आले. मी माझ्या नेत्यांचा आदेश शीर संवाद मानून आपले नाम निर्देशन पत्र परत घेतल्याचे सांगत यापेक्षा अधिक बोलण्याचे टाळले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.