नांदेड - खरिपाची पेरणी तोंडावर असताना बोगस बियाणांचा सुळसुळाट वाढला आहे. नांदेड कृषी विभागाने बोगस बियाणांचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत शेकडो क्विंटल धान्य जप्त केलं आहे. या कारवाईने शेतकरी वर्गात मात्र चिंता वाढली आहे.
नांदेड कृषी विभागाने बोगस बियाण्यावर कारवाई करत शेकडो क्विंटल धान्य जप्त केलं आहे. अर्धापुर तालुक्यातील एका गोडाऊनवर धाड टाकून ही बोगस बियाणांचा भांडाफोड केला आहे. या गोडाऊनमध्ये सोयाबीन, उडीद, हरभरा आणि ईत्तर बोगस बियाणांची पॅकिंग केली जात होतं. या कारवाईत 100 क्विंटल सोयाबीन, 20 क्विंटल हरभरा, 100 क्विंटल उडीद, पॅकिंग मशीन, ग्राईडर मशीन, जप्त करण्यात आलं आहे.
बोगस बियाणे कंपनीवर कृषी विभागाची धाड - नांदेड शहरातील अर्धापुर रोड वरील एका गोदामात सोयाबीन, उडीद, हरभरा या बियाणांची अवैधरित्या बियाणे पॅकिंग कंपनीवर कृषी विभागाने धाडसत्र करत शेकडो क्विंटल बोगस बियाणे हस्तगत केलेय. कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धडक कार्यवाही करत ह्या बोगस बियाणे कंपनीचा कृषी विभागाने भंडाफोड केलाय. ज्यात सदर बोगस बियाणे कंपनीत सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा यांची बोगस बियाणांची पॅकेजिंग करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी नेते संतोष गव्हाणे यांनी कृषी विभागास दिली.
शेकडो क्विंटल बियाणे जप्त - कृषी अधिकारी अनिल शिरपुरे व नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने धाड टाकत हा बोगस बियाणे साठा उघडकीस आणला. ज्यात प्रथम दर्शनी सोयाबीन, उडीद, हरभरा इत्यादी बियाणाची बोगस पध्दतीने बियाणे तयार करण्यात येत असल्याचे आढळून आले. सदर कंपनी ही मयुरी सिड्स,बुलेट ऍग्री प्रॉडक्ट्स या नावाने ही बोगस बियाणे कंपनी चालत असल्याचे निदर्शनास आलं आहे. तर बियाणे कंपनीचा पत्ता, कंपनीचा बोर्ड , बँग वरील ठिकाण,लॉट नंबर, बॅच नंबर अशा अनेक चुका या बोगस कंपनीत कृषी विभागास निदर्शनास आल्या आहेत. तर सदर गोदामात सोयाबीन 100 किवंटल, हरभरा 20 किवंटल, उडीद 100 किवंटल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर मशीन व काम करणारे 20 कामगार आढळून आले आहेत. सदर गोदाम कृषी विभाग व पोलिस प्रशासन यांच्या वतीने सील करण्यात आला.