नांदेड - दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली श्री क्षेत्र माळेगाव (Malegao) येथील खंडोबा देवाची यात्रा (Khandoba Yatra) यंदा होणार असल्याची माहिती अध्यक्षा मंगराणी अंबुलगेकर यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत दिली.
दोन वर्षांपासून यात्रा नाही...!जिल्हा परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत अनेक सदस्यांनी कोरोनामुळे दोन वर्षांपासून माळेगाव यात्रा भरली नाही, मात्र या वर्षी तरी ही यात्रा भरवण्यात यावी अशी मागणी केली. ही यात्रा हवश्या, गवश्या, नवश्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध असून देशभरातून 10 ते 12 लाख भाविक दर्शनासाठी येतात.
सर्वसाधारण सभेत केली घोषणा...!
सर्वच प्रकारच्या अनेक जनावरांचा मोठा बाजार याठिकाणी भरवला जातो. त्यामुळे कोव्हिड नियमांचे पालन करत यंदा माळेगाव यात्रेला परवानगी द्यावी अशी मागणी सदस्यांनी केली होती. यावर जिल्हा परिषद अध्यक्षा मंगारणी आंबूलगेकर यांनी यात्रा होणार असल्याचे जाहीर करताच सर्व सदस्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. माळेगाव यात्रे निमित्ताने कोट्यावधीं रुपयांची उलाढाल होते. ही यात्रा भाविकासह, व्यापाऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणारी आहे.हेही वाचा - Winter Session of Parliament : विरोधकांचा गोंधळ; लोकसभेचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित