ETV Bharat / state

नांदेड : लेखाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली 'अनोखी' परवानगी

author img

By

Published : Mar 3, 2021, 9:16 PM IST

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने घोडा बांधण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो विभागातील सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतिश देशमुख यांनी ही मागणी केली आहे.

satish deshmukh
सतीश देशमुख

नांदेड - जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने घोडा बांधण्याची परवानगी मागितली आहे. पाठीच्या मणक्याच्या त्रासामुळे ही मागणी केल्याचे त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे. तर कर्मचाऱ्यांने केलेल्या मागणीमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांपासून सेवकापर्यंत एकच चर्चा सुरू आहे.

डॉक्टर आणि सतीश देशमुख यांच्यातील संवाद.

पाठीच्या मणक्याचा आहे त्रास -

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने घोडा बांधण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो विभागातील सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतिश देशमुख यांनी ही मागणी केली आहे. पाठीचा त्रास असल्यामुळे बुधवारी रीतसर पत्र लिहून ही मागणी केली आहे. इतकेच नाही तर हे पत्र त्यांनी हे पत्र व्हाट्सअ‌ॅप स्टेटसवर पोस्ट केले. त्यामुळे ते पत्र व्हायरल झाले. हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर जाण्यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यांच्या या मागणीमुळे कर्मचारी आणि नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Accounts Officer Deshmukh wants to give permission to horse in Collector's office
सतीश देशमुख यांनी लिहिलेले पत्र.

घोडे बांधण्याची मागितली परवानगी -

जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या सतीश देशमुख यांनी मणक्याचा त्रास असल्याचे कारण सांगत दुचाकी वापरण्यास त्रास होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कार्यालयात ये-जा करण्यासाठी घोडा वापरणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. घोड्यावरून वेळेत कामासाठी ये-जा करण्यास सोईस्कर होईल, असेदेखील त्यांनी पत्रात म्हटले आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घोडा बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यासोबतच लॉकडाऊनमुळे घोड्याच्या किंमतीदेखील कमी झाल्या आहेत. त्यामुळे घोडा विकत घेण्याची इच्छा देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली - मुख्यमंत्री

देशमुखांचे घोडे जिल्हाधिकारी कार्यालयात?

लेखाधिकारी असलेल्या सतीश देशमुख यांनी केलेल्या मागणीमुळे प्रशासन खडबडून निघाले आहे. याबद्दल त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, यापूर्वी त्यांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कक्षात बोलावून घेतलं होते. त्यामुळे सतीश देशमुख यांच्या चेहऱ्यावरील दबाव स्पष्टपणे दिसत होता. घोडा बांधण्याची मागणी केल्यामुळे नांदेडात एकाच चर्चा सुरू आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे देशमुखांचे घोडे जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार की, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरचा रस्ता दाखवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.