ETV Bharat / state

विवाहितेची प्रियकर चुलत भावाबरोबर आत्महत्या - नांदेड जिल्हा बातमी

दोघांचे एकमेकांवर अपार प्रेम होते. मात्र, भावकी अडसर ठरत होती. मुलीचे लग्न चार महिन्यांपूर्वी झाले होते. मात्र दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरुच होते. मुलगी दिवाळीनिमित्त माहेरी आली. त्यानंतर दोघांनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

मृत कोमल
मृत कोमल
author img

By

Published : Nov 18, 2020, 4:47 PM IST

Updated : Nov 18, 2020, 5:06 PM IST

नांदेड - भावकीचे नाते अडसर ठरते म्हणून वाळकी (बु.) येथे प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.१८ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता उघडकीस आल्याने मारतळा परिसरात खळबळ उडाली. वाळकी (बु.) ते कापसी रस्त्यालगत एका शेतकऱ्याच्या विहिरीत दोन मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याची माहिती येथील ग्रामस्‍थांनी उस्माननगर पोलिसांनी दिली.

लग्नानंतरही सुरूच होते प्रेमसंबंध

वाळकी (ता.लोहा) येथील कोमल श्रीकांत कोलते (वय १९ वर्षे) व धनाजी मुकींद कोलते (वय २२ वर्षे) या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. पण, चार महिन्यांपूर्वी कोमलचा विवाह अर्धापूर येथील एका युवकाशी लावण्यात आला होता. तरीही दोघांचे प्रेमसंबध सुरुच होते.

भावकीचे नाते अडसर ठरते म्हणून घेतला टोकाचा निर्णय

या दोघांच्या प्रेमप्रकरणात भावकीचे नाते अडसर ठरत होते. दोघेही चुलत भाऊ-बहिण होते. दोघांवर या नात्याने प्रचंड दडपण होते. अशातच कोमल ही दिवाळीनिमित्त माहेरी आली होती. त्यातच दोघांनी एकत्र येऊन टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी टाकून आपली जीवनयात्रा संपविली. यावेळी विहिरीतून मृतदेह काढताना दोघांनी एकमेकांना घट्ट बांधल्याचे दिसून आले. मृतदेह काढताना दुर्गंधी सुटल्यामुळे अंदाजे दोन दिवसांपूर्वी दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

कोणालाही दोषी धरू नये अशी चिट्ठी लिहून केली आत्महत्या

धनाजी हा पदवीचे शिक्षण घेत होता. तर कोमलचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. दोघांचीही घरे एकमेकांच्या शेजारी असल्यामुळे प्रेमसंबध जुळून आले. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार आत्महत्या करत आहोत. या प्रकरणात कोणालाही दोषी धरु नये. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत. नाही त्यामुळे जीवनयात्रा संपवित असल्याचे लिहिले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत असल्याची माहिती उपनिरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी दिली.

Last Updated : Nov 18, 2020, 5:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.