ETV Bharat / state

खळबळजनक! रुग्णालयातील कर्मचारी बनून तरुणीने ठेवली अत्याचार पीडित बलिकेवर नजर - नांदेड क्राईम न्यूज

सोनखेड येथे एका पाचवर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. पीडित बालिका शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्यावर उपचार सुरू असताना शासकीय रुग्णालयात एक तरुणी बालिकेवर नजर ठेवत असल्याचे समोर आले आहे.

Representative Image
प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Mar 3, 2020, 9:47 AM IST

नांदेड - सोनखेड येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आणखी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचार पीडित बालिकेवर उपचार चालू असताना तिच्यावर नजर ठेवणाऱ्या एका तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस आणि शासकीय रुग्णालयाने या प्रकरणात आपली नेमणूक केल्याची बतावणी करणाऱ्या या तरुणीने अनेक वेळा बालिकेच्या नातेवाईकांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती समोर आली आहे.

सोनखेड येथे एका पाचवर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पीडित बालिका शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्यावर उपचार सुरू असताना शासकीय रुग्णालयात एक तरुणी तिच्या खोलीच्या अवती-भवती वावरत होती. पीडित बालिकेच्या नातेवाईकांनी वारंवार तिची ओळख जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कधी पोलिसांनी या प्रकरणामध्ये माझी नेमणूक केली आहे, तर कधी रुग्णालयाने बालिकेच्या देखरेखीसाठी मला नेमले आहे, असे सांगून तिने स्वतःची सुटका करून घेतली होती.

हेही वाचा - अहमदनगर पीडिता आणि पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन अज्ञात पोलिसांसह दहा जणांवर गुन्हा दाखल

मात्र, पीडित बालिकेच्या रुग्णालयीन देखरेखीसाठी पोलीस किंवा रुग्णालयाने कोणत्याच तरुणीची नेमणूक केली नसल्याचे चौकशीनंतर स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ या तरुणीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.