ETV Bharat / state

नांदेडमधून 'पॉझिटिव्ह' बातमी... 90 वर्षांच्या आजोबांनी केली कोरोनावर मात - नांदेड कोरोना बातमी

कोरोनाचा उद्रेक वाढला असून दिवसेंदिवस बाधित आणि मृतांचेही प्रमाण वाढत आहे. या भयावह परिस्थितीसमोर अनेकांनी हात टेकले आहेत. मात्र घरातील मुलगा, सून, दोन नाती पॉझिटिव्ह असतानाही हिंमत व इच्छाशक्तीच्या बळावर पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील 90 वर्षीय आजोबा तुकारामजी देशमुख वडगावकर यांनी कोरोनाला यशस्वी झुंज दिली आहे.

नांदेडमधून 'पॉझिटिव्ह' बातमी
नांदेडमधून 'पॉझिटिव्ह' बातमी
author img

By

Published : Apr 27, 2021, 4:30 PM IST

Updated : Apr 28, 2021, 9:47 AM IST

नांदेड - कोरोनाचा उद्रेक वाढला असून दिवसेंदिवस बाधित आणि मृतांचेही प्रमाण वाढत आहे. या भयावह परिस्थितीसमोर अनेकांनी हात टेकले आहेत. मात्र घरातील मुलगा, सून, दोन नाती पॉझिटिव्ह असतानाही हिंमत व इच्छाशक्तीच्या बळावर पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील 90 वर्षीय आजोबा तुकारामजी देशमुख वडगावकर यांनी कोरोनाला यशस्वी झुंज दिली आहे. खचून न जाता त्यांनी कोरोना विरुद्ध दिलेला लढा आशादायी ठरला आहे.

90 वर्षांच्या आजोबांनी केली कोरोनावर मात

घरातील पाच सदस्यांना कोरोनाची लागण

अर्धापूर तालुक्यातील पार्डी म. (ता. अर्धापूर) येथील तुकाराम देशमुख (वय 90) यांना 14 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासोबत त्यांचा मोठा मुलगा नामदेव देशमुख (वय 61) व सूनबाई मीराबाई (वय 57), नात दीपाली (वय 26), गोपाली (22) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. इतर तिघांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यामध्ये मोठा मुलगा नामदेवराव देशमुख यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांनंतर त्यांची तब्येत दुरुस्त झाल्यानंतर त्यांना डिस्टचार्ज देण्यात आला.

ऑक्सिजन सुद्धा लावण्याची गरज पडली नाही

मुलाला डिस्चार्ज मिळतो न मिळतो तो 90 वर्षीय तुकाराम देशमुख यांची तब्येत बिघडली. साधारणपणे रक्तातील सीआरपी सहा असणे अपेक्षित असते, पण तो साठ झाला होता. सिटीस्कोरही आठ वर गेला होता. पण त्यांनी धीर सोडला नसल्याने ऑक्सिजनसुद्धा लावण्याची गरज पडली नाही. त्यांना अतिदक्षता विभागात चार दिवस ठेवण्यात आले होते. त्यानंतर एक दिवस जनरल वॉर्डमध्ये ठेवून डिस्चार्ज देण्यात आला. आज ते कोरोनामुक्त झाले असून तब्येत ठणठणीत झाली आहे. घरातील सर्वही सध्या कोरोनामुक्त झाले आहेत.

सिटीस्कोअर 17 अन् ऑक्सिजन लेवल 75 असतानाही कोरोना रिकव्हर

येळेगाव येथील गोविंदराव गंगाराम कपाटे (वय 55) यांना त्रास होऊ लागल्याने त्यांची टेस्ट केली असता स्कोअर 17 व ऑक्सिजन लेव्हल 75 आली होते. घरातील कर्त्या व्यक्तीला या रोगाची बाधा झाल्याने कुटुंब घाबरून गेले होते. त्यांच्या नातेवाईकांनी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले पण डॉक्टरांनी रुग्ण वाचण्याची कमी शक्यता असून सर्वांना निरोप द्या असे सांगितले. पण त्यांचे पुतने छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी तातडीने हालचाली करुन शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन कपाटे यांचा प्राण वाचविला. काही दिवसाच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यांची प्रकृती पूर्ववत होत असून सध्या ऑक्सिजन लेव्हल 98 आहे. सध्या चांगली असल्याचे दशरथ कपाटे यांनी सांगितले.

इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात

सिटी स्कोअर 10 होता. श्वास घ्यायलाही थोडे अवघड जात होते. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावरही मात करता येते हे लक्ष्मीबाई बोराटे यांनी दाखवून दिले. त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला. योग्यवेळी उपचार मिळाल्याने केवळ चार दिवसात त्या कोरोना आजारातून बाहेर पडल्या आणि आता ठणठणीत आहेत. कोरोना झाला म्हणून घाबरण्याचे कारण नाही. त्याला समर्थपणे सामोरे गेले पाहिजे अशी प्रतिक्रिया लक्ष्मीबाई बोराटे यांनी यावर व्यक्त केली.

हेही वाचा - 'लस उपलब्ध नसेल तर, 1 मेपासून सुरू होणारी लसीकरण मोहीम राबवायची कशी'

Last Updated : Apr 28, 2021, 9:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.