ETV Bharat / state

नांदेड : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस, खरीपाची 80 टक्के पेरणी पूर्ण - नांदेड जिल्हा बातमी

नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा 13 टक्के जास्त पाऊस पडल्याने जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे. चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील 80 टक्के खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे.

file photo
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 25, 2020, 2:30 PM IST

नांदेड - जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 13 टक्के जास्त पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस धर्माबाद, नांदेड, हिमायतनगर तालुक्यात पडला आहे. पावसाच्या प्रमाणात पाहता ओलिताखाली असलेल्या मुदखेड, हिमायतनगर, भोकर व उमरी तालुक्यातील खरीपाच्या 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

मुखेड तालुक्यातील 18 हजार 822 हेक्टर या संपूर्ण खरीप क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर भोकर तालुक्यात 47 हजार 269 हेक्टर क्षेत्रापैकी 39 हजार 354 हेक्टरमध्ये म्हणजेच 83 टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली. त्या पाठोपाठ हिमायतनगर, उमरी तालुक्यात अनुक्रमे 81 व 80 टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे.

जिल्ह्यातील इतर तालुक्यात मात्र कमी अधिक प्रमाणात खरीपाची पेरणी संपत आली असली तरी पेरणीचे प्रमाण कमी आहे. मगील दहा वर्षांनंतर यावर्षी पहिल्यांदाच रोहिणी नक्षत्रात जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्यानंतर मृग नक्षत्रात जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यात सर्वच भागात खरीप पेरणीला वेग आला. जिल्ह्यातील काही भागात पावसाने दडी मारल्याने काही भागात पेरले ते उगवलेच नाही, यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. प्राप्त अहवालनुसार 7 लाख 42 हजार 861 हेक्टर खरीप क्षेत्रांपैकी 60 टक्के तर काही भागात 70 टक्के क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 751 मि.मी. पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या 19 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता, जिल्ह्यातील किनवट व माहूर तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी जास्त आहे.

हेही वाचा - फळविक्रेत्या महिलेचा प्रामाणिकपणा; ४८ हजार रुपये किंमतीची अंगठी केली परत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.