ETV Bharat / state

नांदेड : एटीएम सेंटरवर वृद्धाला फसवून ३७ हजाराची रोकड लांबवली

author img

By

Published : Nov 15, 2019, 12:35 PM IST

पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरवर गेलेल्या वृध्दाला हातचलाखीने फसवल्याची घटना नांदेडच्या स्नेहनगर भागात घडली. वृद्धाने दिलेल्या फिर्यादीवरुन भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एटीएम सेंटरवर वृद्धाला फसवले

नांदेड - पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरवर गेलेल्या वृध्दाला हातचलाखीने फसवल्याची घटना घडली. अज्ञात आरोपीने वृद्घाच्या बँक खात्यातील ३७ हजार रूपये लांबवले.

रोनाल्ड जॉर्ज जेम्स (वय-७१, रा. श्रीनगर, नांदेड) असे फसवल्या गेलेल्या वृद्धाचे नाव आहे. शहरातील स्नेहनगर पोलीस कॉलनीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरवर २२ सप्टेंबरला रोनाल्ड जेम्स पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा एका अनोळखी इसमाने एटीएम कार्ड सुरू करुन देतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्याने रोनाल्ड यांचे एटीएम कार्ड स्वत:कडे घेऊन आपल्याकडील एटीएम कार्ड रोनाल्डला दिले.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची राऊत यांनी अशी उडवली खिल्ली

यानंतर मागील दोन महिन्याच्या काळात अज्ञात आरोपीने दोनदा रोनाल्ड यांच्या खात्यातून २० आणि १७ असे एकूण ३७ हजार रुपये काढले. फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर रोनाल्ड यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १३ नोव्हेंबरला भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:नांदेड : एटीएम सेंटरवर वृद्धाला फसविले.
- ३७ हजार काढून भामटा पसार.

नांदेड : शहरातील एका एटीएम सेंटरवर गेलेल्या वृध्दाला हातचलाखीने फसविल्याची घटना घडली आहे.Body:शहरातील स्नेहनगर पोलीस कॉलनीतील स्टेट बँक ऑफ इंडिया येथील एटीएम सेंटरवर २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी श्रीनगर भागात राहणारे रोनाल्ड जॉर्ज जेम्स-७१ हे पैसे काढण्यासाठी गेले होते. तेव्हा एटीएम कार्ड इन्स्टॉलेशन न झाल्याने एका अनोळखी इसमाने मी तुमचे एटीएम कार्ड इन्स्टॉल करुन देतो म्हणून विश्वास संपादन केला आणि रोनाल्ड यांचे एटीएम कार्ड घेऊन आपल्याकडील एटीएम कार्ड त्याला सोपविले. नंतर रोनाल्डच्या कार्डवरुन
त्याने २० हजार रुपये व १७ हजार रुपये असे एकूण ३७ हजार रुपये काढून घेऊन फसवले.Conclusion:
या प्रकरणी रोनाल्ड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन १३ नोव्हेंबर रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द गुरनं ३५६/१९ कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.