ETV Bharat / state

नांदेड कोरोना अपडेट : सहा महिन्याची मुलगी कोरोनामुक्त तर दोन बालकांना कोरोनाची लागण

शहरातील करबला भागातील सहा महिन्याची मुलगी 24 मेला कोरोनाबाधित आढळली होती. यानंतर प्रथम तिला पंजाब भवन येथील कोवीड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे दाखल करण्यात आले. तपासणी अंतर्गत तिला गंभीर संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर त्वरीत आणि योग्य तो उपचार झाल्याने तिच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा झाली.

author img

By

Published : Jun 2, 2020, 8:18 PM IST

Government medical college & hospital, nanded
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड

नांदेड - आज (मंगळवारी) आलेल्या अहवालात सहा महिन्याची मुलगी कोरोनामुक्त झाली आहे. तर दोन बालकांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहरातील करबला भागातील सहा महिन्याची मुलगी 24 मेला कोरोनाबाधित आढळली होती. यानंतर प्रथम तिला पंजाब भवन येथील कोवीड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी येथे दाखल करण्यात आले. तपासणी अंतर्गत तिला गंभीर संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यावर त्वरीत आणि योग्य तो उपचार झाल्याने तिच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा झाली आणि ती कोरोनामुक्त झाली. तिला मंगळवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर आज (मंगळवारी) आढळलेल्या तीन रुग्णांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के, उपजिल्हाधिकारी श्री.प्रशांत शेळके तसेच डॉ.संजय मोरे, नोडल ऑफीसर डॉ. वाय. एच. चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक हे उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये जिल्हाधिकारी नांदेड यांनी कोरोनाबाधित झालेल्या मुलीच्या आईची सहानुभूतीपुर्वक विचारपूस केली. त्यावेळी झालेल्या उपचाराबद्दल मुलीच्या आईने समाधानकारक असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर आणि आयुक्त लहाने यांनी सदरील मुलीवर उपचार करणाऱ्या बालरोगशास्त्र विभागातील विभाग प्रमुख डॉ.सलीम तांबे, डॉ.किशोर राठोड, डॉ.अरविंद चव्हाण, डॉ.सरफ़ाज अहमद, डॉ.नागेश लोणीकर, डॉ.बंटेवाड, डॉ. समीर आणि डॉ.सुप्रीया यांचे कौतुक केले.

तर आज (मंगळवार) प्राप्त झालेल्या एकूण 67 अहवालापैकी 60 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 3 रुग्णांचा पॉझिटीव्ह आढळले. यापैकी एक मुलगी (वय - ७) आणि एक मुलगा (वय - ४) आहेत. दोन्ही रुग्ण लोहार गल्ली येथील आहेत. तर एक रुग्ण पुरुष (वय - 55) कुंभारटेकडी सराफा बाजार नांदेड येथील रहिवासी आहे. त्याच्यावर पंजावभवन कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरु आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 152 झाली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथील 1 रुग्ण बरा झाल्यामुळे त्यास रुग्णालयातून मंगलवारी सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत 152 रुग्णांपैकी 121 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर उर्वरित 23 रुग्णांवर औषधपचार चालू आहे. त्यातील 3 रुग्णांपैकी 2 स्त्री रुग्ण आहेत. त्यांचे वय अनुक्रमे 52, 65 आहे. तर 1 पुरुष ज्याचे वय 38 वर्ष आहे. त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
जिल्ह्यातील संक्षिप्त माहिती - (02 जून संध्याकाळी 5.00 पर्यंत.)

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 4143
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 3902
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 2075
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 112
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 96
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3806

आज घेतलेले नमुने - 158
• एकुण नमुने तपासणी- 4153
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 152
• पैकी निगेटीव्ह - 3546
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 267
• नाकारण्यात आलेले नमुने - 28
• अनिर्णित अहवाल – 155

• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले - 121
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 8
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी - 140922 त्यांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.