ETV Bharat / state

धोका वाढतोय! नांदेड जिल्ह्यात 597 व्यक्ती कोरोना बाधित, सहा जणांचा मृत्यू - आरटीपीसीआर

नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 87 अहवालापैकी 597 अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

597 persons corone infected in Nanded district
नांदेड जिल्ह्यात 597 व्यक्ती कोरोना बाधित, सहा जणांचा मृत्यू
author img

By

Published : Mar 17, 2021, 9:25 PM IST

नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 87 अहवालापैकी 597 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 355 तर अँटिजेन तपासणीद्वारे 242 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 28 हजार 520 एवढी झाली आहे. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत रुग्णांची संख्या 624-

सोमवार 15 मार्च रोजी लेबर कॉलनी नांदेड येथील 58 वर्षाच्या एका पुरुषाचा तर मंगळवार 16 मार्च 2021 रोजी नावघाट नांदेड येथील 45 वर्षाच्या एका महिलेचा, चैतन्यनगर नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा, नायगाव नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर बुधवार 17 मार्च 2021 रोजी नंदीग्राम सोसायटी नांदेड येथील 61 वर्षाच्या एका महिलेचा व हाडको नांदेड येथील 81 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 624 एवढी झाली आहे.

40 बाधितांची प्रकृती अतीगंभीर-

आजच्या 2 हजार 87 अहवालापैकी 1 हजार 453 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 28 हजार 520 एवढी झाली असून यातील 24 हजार 329 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 3 हजार 343 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 40 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

जिल्ह्यात 3 हजार 343 बाधितांवर औषधोपचार सुरु-

जिल्ह्यात 3 हजार 343 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 141, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 74, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 78, किनवट कोविड रुग्णालयात 58, मुखेड कोविड रुग्णालय 56, देगलूर कोविड रुग्णालय 11, हदगाव कोविड रुग्णालय 17, लोहा कोविड रुग्णालय 62, कंधार कोविड केअर सेंटर 3, महसूल कोविड केअर सेंटर 80, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 915, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 563, खाजगी रुग्णालय 285 आहेत.

सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे-

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 22 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकूण घेतलेले स्वॅब- 2 लाख 56 हजार 787
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 23 हजार 482
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 28 हजार 520
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 24 हजार 329
एकूण मृत्यू संख्या-624
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 85.30 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-24
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-13
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-311
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 343
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले- 40

हेही वाचा- लस ही कवच-कुंडल.. मात्र लस घेतल्यानंतरही होऊ शकतो कोरोना - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.