ETV Bharat / state

नांदेडमध्ये खासगी अधिकाऱ्याला बंदुकीचे धाक दाखवत 57 हजारांनी लुटले - नांदेड अधिकाऱ्याला लुटले

मिल्लतनगर भागात त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने गुगलेच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी केली. त्यांच्या दुचाकीची चाबी काढून घेत पैश्याची बॅग हिसकावन्याचा प्रयत्न केला. गुगले यांनी प्रतिकार केला असता आरोपीने मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवला. गावठी कट्यातून फायरींग करत रोहितकडील 57 हजार रुपयांची बॅग बळजबरीने हिसकावून पसार झाले.

नांदेड पोलीस
नांदेड पोलीस
author img

By

Published : Jun 15, 2021, 7:08 PM IST

Updated : Jun 15, 2021, 7:23 PM IST

नांदेड - गोळीबाराच्या घटनेने शहरात पुन्हा एकदा दहशत पसरली आहे. बचतगटाची बैठक संपवून जाणाऱ्या एका व्यक्तीला दोन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली. आरोपींनी बंदुकीतून फायरिंग करत त्याच्याजवळील 57 हजार रुपये लुटल्याचा प्रकार मंगळवारी (आज) सकाळी मिल्लतनगर भागात घडला आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे.

नांदेड पोलीस

मिल्लत नगरमधील घटना

शहरातील क्रेडीट अ‌ॅक्सिस ग्रामीण लिमिटेड येथे कार्यरत केंद्र व्यवस्थापक रोहित गुगले हे सकाळी बचगटाच्या बैठकीसाठी गेले होते. तेथून बचत गटाचे 57 हजार रुपये घेवून आपल्या दुचाकीने परत जात असतांना मिल्लतनगर भागात त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने गुगलेच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी केली. त्यांच्या दुचाकीची चाबी काढून घेत पैश्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. गुगले यांनी प्रतिकार केला असता आरोपीने मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवला. गावठी कट्यातून फायरिंग करत रोहितकडील 57 हजार रुपयांची बॅग बळजबरीने हिसकावून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे, चंद्रसेन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवाराचे साहेबराव नरवाडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती घेवून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. दिवसा फायरिंग करुन झालेली ही लुटीची घटना नक्कीच चिंताजनक आहे. इतवारा पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहे. नांदेडात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. खून, दरोडा आणि लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. मल्लत नगर येथे घडलेल्या घटनेने गुन्हेगारीत भर पडली आहे.

हेही वाचा -भाच्याचा खून करणाऱ्या आरोपीला मामाने यमसदनी धाडले

Last Updated : Jun 15, 2021, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.