नांदेड : प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील २४ साखर कारखान्यांत आतापर्यंत ५१ लाख ५४ हजार टन उसाचे गाळप झाले असून यात ४९ लाख १२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले, अशी माहिती साखर सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली.
नांदेड विभागातील २४ कारखान्यात ५१ लाख टन ऊसाचे गाळप २४ कारखान्याचे गाळप सुरूनांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात १७ खासगी, तर नऊ सहकारी साखर करण्याचा समावेश होता. आजपर्यंत २४ कारखान्यांनीच गाळप सुरु केले आहे. यात १० सहकारी तर १४ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
साखर उतारा ९.५३विभागाचा सरासरी साखर उतारा ९.५३ आहे. नांदेड जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण, एमव्हीके वाघलवाडा, शिवाजी शुगर, बाऱ्हाळी, हडसणी येथील सुभाष शुगर लिमिटेड, कुंटूरकर शुगर्स लिमिटेड (कुंटूर) व व्यंकटेश्वरा ( शिवणी), तर हिंगोलीमधील भाऊराव चव्हाण (डोंगरकड़ा), पूर्णा सहकारी साखर कारखाना (वसमत), कपिश्वर शुगर, बाराशिव, टोकाइ कारखाना (कुरुंदा), शिऊर साखर कारखाना (वाकोडी), परभणी जिल्ह्यातील बळिराजा साखर कारखाना (कानखेड), गंगाखेड शुगर, ट्वेंटीवन शुगर (सायखेडा), योगेश्वरी (लिंबा), रेणुका (पाथरी), त्रिधारा शुगर लि. अहमदपूर हे कारखाने सुरु झाले आहेत.
नांदेड विभागातील सुरू असलेल्या कारखान्याची संख्या व गाळप (टनमध्ये)- नांदेड (सहा)-१०,६३,५९५.
- लातूर (सात)-१७,४०,१२०.
- परभणी (सहा)-१४,७२,९०२
- हिंगोली (पाच)-०८,६७,४३३
- एकूण - (२४ कारखाने)-५१,५४,०५०