नांदेड : परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात सोयाबीन, ज्वारीसह इतर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वीज पडून हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा-मंगरूळ येथे शेतमजूर व लोहा तालुक्यातील धावरी तांडा येथील तीन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला. सुनील साहेबराव वायकोळे (३६, रा. वारंग टाकळी), माधव पिराजी डुबुकवाड (४५, रा. पानभोसी, ता. कंधार), पोचीराम शामराव गायकवाड (४६, रा. पेठ पिंपळगाव, ता. पालम) व रूपाली पोचीराम गायकवाड (१०) अशी ( lightning death in Nanded ) मृतांची नावे आहेत.
परतीच्या पावसाने जीवितहानीही झाली ( 4 people killed by lightning ) आहे. मंगळवारी (१८ ऑक्टाेबर) नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर भागात जाेरदार हजेरी लावली. हिमायतनगर परिसरात साेयाबीनच्या मळणीयंत्रावर बसून जात असताना अचानक वीज कोसळली. यात सुनील वायकोळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर साहेबराव आबाराव टोकलवाड (२०) व गजानन शंकर टोकलवाड (२२) जखमी झाले.
दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार १९ रोजी औरंगाबाद, बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील तीन दिवस हलक्या स्वरूपात पाऊस पडेल, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा, मुख्य प्रकल्प समन्वयक प्रभारी प्रा. एम.जी. जाधव यांनी सांगितले आहे. आजपर्यंत नांदेडमध्ये वीज पडून १४ जणांचा मृत्यू नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबरदरम्यान वीजपडून १४ जणांचा मृत्यू झाला. तसेच ११ जण पुरात वाहून गेले. तर ७२२ जनावरे दगावली.