नांदेड - कोरोनाच्या काळातही शहरामध्ये गरीब व सर्वसामान्य रुग्णांना सेवा देणारे एकमेव आधार म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी रुग्णालयाकडे पाहिले जाते. पण, प्रत्यक्षात अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांना सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत आहे. या सरकारी रुग्णालयातील तब्बल विविध 386 पदे रिक्त आहेत.
कोरोना बाधितांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नसतात. त्यामुळे बहुतांश कोरोना बाधित सरकारी रुग्णालयात दाखल होतात.
डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील रिक्त पदे...!
- डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वर्ग एकची एकूण ४६१ आहेत. वर्ग एकचे ६० पदे मंजूर आहेत. तर ५४ पदे भरली असून ६ रिक्त पदे आहेत.
- दोनची ७४ पदे मंजूर आहेत. ६२ पदे भरली असून २८ पदे रिक्त आहेत.
- वर्ग तीनची १३६ पदे मंजूर आहेत ८४ पदे भरली असून ५२ पदे रिक्त आहेत.
- वर्ग चारची १३६ पदे मंजूर आहेत. ८४ पदे मंजूर असून ५२ पदे रिक्त आहेत.
हेही वाचा-नांदेडात कोविड-नॉन कोविड रुग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित.....!
सरकारी रुग्णालयात २८८ रिक्त पदे...!
- शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील एकूण ९५२ पदे मंजूर आहेत. ६६४ पदे भरली असून २८८ पदे अद्यापही रिक्त आहेत.
- यामध्ये वर्ग एकची ९ पदे मंजूर असून सर्व पदे रिक्त आहेत.
- वर्ग दोनची ३४ पदे मंजूर आहेत. ३० पदे भरली असून ४ पदे रिक्त आहेत.
- वर्ग तीन (तांत्रिक) ची ५० पदे मंजूर आहेत. ४१ पदे भरली असून ९ पदे रिक्त आहेत.
- वर्ग तीन (अतांत्रिक) २८ पदे मंजूर आहेत. २६ पदे भरली असून २ पदे रिक्त आहेत.
- शुश्रूषा विभागात ५८५ पदे मंजूर आहेत. ४०८ पदे भरली असून १७७ रिक्त पदे आहेत.
- वर्ग चारची २४६ पदे मंजूर आहेत. १५९ पदे भरली असून ८७ पदे रिक्त आहेत.
हेही वाचा-नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची परिस्थिती लाज वाटावी अशी - खासदार चिखलीकर
कोरोना काळात तारेवरची कसरत-
सध्या जरी कोरोना बाधितांची संख्या कमी असली तरी मध्यंतरीच्या कालावधीत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. तेव्हा रुग्णालयात अपुरे कर्मचारी होते. त्यातच खासगी रुग्णालयात इतर उपचारासाठी डॉक्टर धजावत नव्हते. सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात इतर रुग्णांची संख्याही वाढली होती. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णालयाती कर्मचाऱ्यांवर ताण येतो. रुग्णांनाही उपचार मिळविण्यात अडचणींना सामोरे जावे लागते.
- कोरोना बाधितांची संक्षिप्त माहिती.....!
( दि.२१ डिसेंबर २०२० पर्यंत) - एकूण घेतलेले स्वॅब- 1 लाख 71 हजार 914
- एकूण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 46 हजार 752
- एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 60
- एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार
- एकूण मृत्यू संख्या-563
- उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.96 टक्के
- आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1
- आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4
- आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-508
- रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-300
- आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-13.
तातडीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याची गरज!
अपुऱ्या कर्मचारी असल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. सेवा देण्याची इच्छा असूनही डॉक्टर, परिचारिका इतर कर्मचाऱ्यांना सेवा देणे कठीण झाले आहे. प्रशासकीय स्तरावर आरोग्य सेवेला तरी प्राधान्य द्यावे, अशी मागणी रुग्णालयाचे नातेवाईक व रुग्णांमधून होत आहे.
खासदार प्रतापराव चिखलीकरांनीही केली होती टीका-
डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिस्थिती पाहून खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांना सप्टेंबर 2020 मध्ये धक्का बसला होता. ते म्हणाले होते, की खासदार म्हणून मला लाज वाटावी अशी परीस्थिती आहे. सगळा सावळा गोंधळ व्यथित करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आरोग्य यंत्रणा, प्रशासन व राज्य सरकारवरसुद्धा टीका केली होती.