ETV Bharat / state

नांदेड; 'बर्ड फ्लू' उपाय योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३२ शीघ्र कृतीदल स्थापन - नांदेड बर्ड फ्लू न्यूज

नांदेड जिल्ह्यात जवळपास १६५ पोल्ट्री फार्म असून यात अंदाजित ४५ हजार पक्षी आहेत. या पोल्ट्री फार्मच्या संपर्कात पशुवैद्यकीय विभागाचे शिघ्रकृतीदलातील सदस्य असून त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले.

नांदेड; बर्ड फ्लू उपाय योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३२ शीघ्र कृतीदल स्थापन

author img

By

Published : Jan 13, 2021, 7:35 AM IST

नांदेड - जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका संभवू नये यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे १६ तालुक्यांमध्ये ३२ शिघ्रकृतीदल स्थापन करण्यात आले आहेत. या कृतीदलात सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, परिचर यांचा समावेश असून एका पथकात ५ सदस्य आहेत. आरोग्याच्यादृष्टिने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेशी आम्ही समन्वय साधून असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

११२ जागा विचारात..
शासनाने याबाबत अनेक निर्देश दिले आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील ११२ पानथळ जागा / जलाशय विचारात घेतली आहेत. या जलाशयांवर शिघ्रकृती दलातील सदस्‍य स्वत: पाहणी करुन विस्थापित होणाऱ्या पक्षांकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.

जिल्ह्यात एकूण १६५ पोल्ट्री फार्म
नांदेड जिल्ह्यात जवळपास १६५ पोल्ट्री फार्म असून यात अंदाजित ४५ हजार पक्षी आहेत. या पोल्ट्री फार्मच्या संपर्कात पशुवैद्यकीय विभागाचे शिघ्रकृतीदलातील सदस्य असून त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले.

नागरिकांनी घाबरू नये
सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूची कोणतेही घटना / प्रकरण निदर्शनास आले नसून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये व लोकांनीही अफवा पसरू नये, असे आवाहन त्यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.