नांदेड - अर्धापूर शहरातील गजबजलेल्या बसवेश्वर चौकातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी अवघ्या 15 मिनिटात ए़टीएम फोडून तब्बल 31 लाख रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी पहाटे 3.29 ते 3:42 वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गॅस कटरच्या साहय्याने फोडली मशीन -
अर्धापूर शहरातील बसवेश्वर चौकात स्टेट बॅक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. हे एटीएम मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी फोडून यातील रोख 31 लाख लंपास केले. अज्ञात चोरटे कारमध्ये आले होते. ही चोरी तिघांनी केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहय्याने एटीएम फोडले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - मुलाकडून ऑनलाईन गेम खेळताना एक चूक; शिक्षिकिने गमाविले तीन लाख रुपये
कृत्य करणारी आंतरराज्य टोळी?
हे कृत्य करणारी आंतरराज्य टोळी असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, घटनेचा गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपशिभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजनकर यांनी घटना स्थळी भेट दिली व तपासासंदर्भात सुचना दिल्या. तसेच श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले होते.
असा झाला घटनाक्रम -
|
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल -
याप्रकरणी बँक अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून, अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगावकर, पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे, साईनाथ सुरवसे, बळीराम राठोड, कल्याण गूळकर यांनी भेट दिली.
हेही वाचा - स्टेट बँकेतून पैसे काढण्याकरिता बदलले नियम; जाणून घ्या अन्यथा होईल नुकसान