ETV Bharat / state

नांदेड रेल्वे विभागातून 200 वी किसान रेल्वे रवाना, शेतकऱ्यांना मालवाहतुकीवर 50 टक्क्यांची सूट - किसान रेल्वे लेटेस्ट न्यूज नांदेड

नांदेड रेल्वे विभागातील नगरसूल येथून २०० वी किसान रेल्वे २४६ टन कांदा घेवून पश्चिम बंगाल येथील मालडा टाऊनकडे रवाना झाली आहे. नांदेड रेल्वे विभागातून या वर्षी दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. १६३ दिवसांत २०० किसान रेल्वेंनी नगरसूल येथून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्ष आणि इतर शेतीमाल पोहोचवला आहे.

नांदेड रेल्वे विभागातून 200 वी किसान रेल्वे रवाना

author img

By

Published : Jun 16, 2021, 6:29 PM IST

नांदेड - रेल्वे विभागातील नगरसूल येथून २०० वी किसान रेल्वे २४६ टन कांदा घेवून पश्चिम बंगाल येथील मालडा टाऊनकडे रवाना झाली आहे. नांदेड रेल्वे विभागातून या वर्षी दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी सुरू केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. १६३ दिवसांत २०० किसान रेल्वेंनी नगरसूल येथून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्ष आणि इतर शेतीमाल पोहोचवला आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून आपल्या मालाची वाहतूक केल्यास शेतकऱ्यांना मालवाहतुकीवर 50 टक्के सूट देण्यात येत आहे. या संधीचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी केले आहे.

रेल्वेला २८.३५ कोटी रुपयांचा महसूल

अशा प्रकारच्या मालवाहतुकीमधून नांदेड रेल्वे विभागाला २८.३५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. किसान रेल्वेकडून शेतकऱ्यांना वाहतूक दरामध्ये 50 टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे किसान रेल्वेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, 163 दिवसांमध्ये 200 किसान रेल्वेच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी रेल्वे विभागाचे अभिनंदन केले आहे.

कांदा, टरबूज आणि द्राक्षाची वाहतूक

या २०० किसान रेल्वे गाड्यामधून आजपर्यंत ६१ हजार ७४७ टन कांदा, टरबूज आणि द्राक्षाची वाहतूक झाली आहे. हा शेतीमाल देशातील विविध भागात जसे न्यू गुवाहाटी, नावगाचिया, डानकुनी, मालडा टाऊन, गौर माल्दा, अगरतला, फातुहा, न्यू जलपैगुडी इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळत आहे. नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणाहून देखील किसान रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

'ऑपरेशन ग्रीन्स –टॉप टू टोटल अभियान'

कृषी क्षेत्राच्या मार्केटींगकरता अडचणी मुक्त, सुरक्षीत व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना, कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे. किसान रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात, साधारणपणे ५० किलोमीटर प्रती घंटा या वेगाने त्या धावतात, यामुळे शेती माल वेळेवर पोहोचवणे शक्य होते. शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते. शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहित करण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने "ऑपरेशन ग्रीन्स टॉप टू टोटल" अभियानांतर्गत फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर ५० % सवलत देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा - रायगड जिल्ह्यात पहाटेपासून पावसाचे जोरदार आगमन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.