ETV Bharat / state

187 Crore Works Break in Nanded : नव्या सरकारचा पुन्हा धक्का; नांदेड जिल्ह्यातील १८७ कोटींच्या कामांना ब्रेक - खासदार प्रतापराव चिखलीकर

नवीन सरकार ( New Government ) स्थापन झाल्यानंतर ह्या सरकारने मागील सरकारचे निर्णयांना स्थगिती देण्याचे काम चालूच ठेवले आहे. त्यामुळे आतासुद्धा नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागांतर्गत ( Works of Under Water Resources Department ) मंजूर असलेल्या तब्बल १८६ कोटी ८१ लाख रुपयांच्या १०१ कामांना स्थगिती ( 187 Crore Works Break in Nanded ) दिली आहे. त्यामुळे नांदेडच्या कामांना आता ब्रेक लागला आहे. ( CM Eknath Shinde ) ( Ashok Chavan Former Chief Minister ) ( MP Prataprao Chikhlikar )

Former Chief Minister Ashok Chavan
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
author img

By

Published : Jul 17, 2022, 12:20 PM IST

नांदेड : नांदेड महापालिका हद्दीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची देयके अदा करू नयेत, असा निर्णय काही दिवसांपूर्वी नव्या सरकारने ( New Government ) घेतला होता. त्यानंतर आता दुसरा धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी नांदेड जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत ( Works of Under Water Resources Department ) मंजूर असलेल्या निविदा प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यातील तब्बल १८६ कोटी ८१ लाख रुपयांच्या १०१ कामांना स्थगिती दिली आहे. ( Ashok Chavan Former Chief Minister ) या दोन निर्णयांमुळे नांदेडातील रस्त्यांसह जलसंधारणाच्या कामाला ब्रेक लागणार आहे. ( Ashok Chavan Former Chief Minister ) आता भाजपचे खासदार प्रताप पाटील ( MP Prataprao Chikhlikar ) यांच्या भूमिकेकडे लक्ष सर्वांचे लक्ष आहे.

स्थगिती पॅटर्न : जलसंधारणाच्या १०१ कामांचा समावेश : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा होता. पदभार आला आणि नांदेडच्या कामांना गती मिळाली. पालकमंत्री म्हणून अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहर व जिल्ह्यातील रस्ते व विविध कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला होता. यातील बहुतांश कामांच्या निविदा अंतिम टप्प्यात असताना राज्यात सत्ता परिवर्तन झाले.

नांदेड महापालिका हद्दीतील कामांना स्थगिती : नवीन सरकारकडून महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. त्यातच नांदेड महापालिका हद्दीत रस्त्यांची १५० कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली होती. परंतु, या कामांची देयके अदा करू नयेत, अशा सूचना सरकारकडून करण्यात आल्या. त्यानंतर आता शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्ह्यातील जवळपास १८७ कोटींच्या १०१ कामांना स्थगिती दिली आहे. यामध्ये सिमेंट नाला बंधारा, साठवण, तलाव, द्वारयुक्त सिमेंट नाला बंधारा, को. प. बंधारा अशा कामांचा समावेश आहे.

अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले मनोगत : सदरील कामे प्रशासकीय मान्यतेनंतर निविदेच्या अंतिम टप्प्यात होती. सदरील कामे रद्द होण्याची भीती नांदेडात दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली होती. जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवते, उन्हाळ्यामध्ये लोकांचे हाल होतात, ही बाब लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे मंजूर करण्यात आली होती. परंतु, त्या कामांना स्थगिती दिल्याचे समजते. राजकारण बाजूला ठेवून विकासाची कामे करावी, अशी अपेक्षा सरकारकडून आहे. जी कामे मंजूर आहेत, ती तरी पूर्णत्वास नेण्याचे काम सरकारने करावे. - अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री

सर्वाधिक २० कामे लोहा तालुक्यातील : नव्या सरकारने स्थगिती दिलेल्या १०१ कामांपैकी सर्वाधिक कामे ही लोहा तालुक्यातील २० कामांचा समावेश आहे. यामध्ये भेंडेगाव, हरसड, पिंपळगाव, पळशी, जवळा, उमरा, दगडसांगवी, कापसी, रिसनगाव, हिंदोळा, मुरंबी, नगरवाडी येथील बंधाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उमरी तालुक्यातील ५, भोकर - १७, नांदेड - १९, हदगाव -१०, मुदखेड ७, अर्धापूर -३, देगलूर -२, किनवट -२, बिलोली - ९ आदी कामांचा समावेश आहे.

प्रतापराव चिखलीकरांच्या भूमिकेकडे लक्ष : शिंदे-भाजपा सरकारच्या बाजूने असलेल्या खासदार प्रतापराव चिखलीकर ( MP Prataprao Chikhlikar ) आणि आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या भूमिकेकडे आता नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निविदा प्रक्रियेत असलेल्या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे नांदेडातील जलसंधारणाची कामे थांबणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : CM Eknath Shinde : ठाण्यात उद्धव ठाकरेंना 'धक्के पे धक्का'; झेडपीच्या अध्यक्षासह १५० नगरसेवक शिंदे गटात सामील

हेही वाचा : Kirit Somaiya on Aarey : कारशेडचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी झाडे तोडण्याची गरज नाही- किरीट सोमैय्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.