ETV Bharat / state

Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेसाठी गेलेले नांदेड येथील 'ते' १८ भाविक आर्मी कॅम्प येथे सुरक्षित

अमरनाथ यात्रेला जाणारे यात्रेकरू खराब हवामानामुळे अमरनाथ गुफेपासून 6 किमी अलीकडे पंचतरणी येथे अडकून पडले आहेत. सध्या ते आर्मी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. नांदेड जिल्हा नियंत्रण कक्ष त्यांच्याशी सतत संपर्कात आहे.

Amarnath Yatra 2023
अमरनाथ यात्रा
author img

By

Published : Jul 8, 2023, 7:00 PM IST

नांदेड : येथील 18 भाविक व त्यांच्यासोबत पुणे येथील 1 असे 19 भाविक नांदेड येथून मनमाड व पुढे मनमाडवरून जम्मू मार्गे आमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. ते पहलगाम येथे पोचून पुढे दिनांक 6 जुलै 2023 रोजी अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले. नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आढावा घेवून तेथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून अधिक व्यवस्था केली आहे. वातावरण अनुकूल झाल्याबरोबर सर्वांना सुरक्षितरित्या पहलगाम येथे आणण्यात येईल. त्यामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

उपजिल्हाधिकारी समन्वय साधून : निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे समन्वय साधत असून जिल्ह्यातील खालील व्यक्ती या तिथे अडकलेल्या आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. हे आहेत अडकून पडलेले नागरिक:
1. अनिल पांपटवार
2. संजय मनाठकर
3. राजेंद्र मनाठकर
4. मंजुषा दमकोंडवार
5. अरुण दमकोंडवार
6. प्रवीण सोनवणे
7. विजया सोनवणे
8. विजयनाथ तोनशुरे
9. शिवकांता तोनशुरे
10.सुरेखा पत्रे
11. शामल देशमुख
12. प्रमोद देशपांडे
13. मंजुषा देशपांडे
14. मिसेस कडबे
15. तुकाराम कैळवाड
16. पंकज शीरभाते
17. प्रणिता शिरभाते
18. आकुलवार
19. निलेश मेहेत्रे अशी आहेत.

अधिक माहितीसाठी या क्रमांकावर साधा संपर्क : अधिक माहितीसाठी नातलगांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील यांच्याशी +91 94228 75808 या मोबाईल क्रमांकावर साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अमरनाथ गुहा मंदिरात पहाटेची आरती : १ जुलैपासून सुरू झालेली अमरनाथ यात्रा एकूण ६२ दिवस चालणार आहे. अमरनाथ दर्शनासाठी भाविकांचा जथ्था पोहोचत आहे. यावेळी मंदिरात सकाळ संध्याकाळ आरतीही केली जात आहे. बालटाल ते मंदिरापर्यंत 13 किमी लांबीचा प्रवास अत्यंत घातक डोंगराळ प्रदेशांमधून जातो. येथे स्थानिक गावकरी यात्रेकरूंना मदत करतात. हिमालयातील दुर्गम तीर्थयात्रा यशस्वी करण्यात स्थानिक लोकांचे खूप महत्वाचे योगदान आहे. कारण त्यांना डोंगराळ प्रदेशाचे भरपूर ज्ञान तसेच अनुभव असतो. त्यांच्या अनुभवामुळे आत्तपर्यंत अनेक पर्यटकांना वाचवण्यात यश आले आहे. अमरनाथ यात्रेसाठी दोन मार्ग आहेत. एक अनंतनाग जिल्ह्यातील 48 किमी लांबीचा पारंपारिक नुनवान-पहलगाम मार्ग म्हणून ओळखला जातो. तर, दुसरा गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्ग आहे जो सुमारे 14 किमी लांबीचा आहे. हा मार्ग यात्रेंकरुनसाठी अत्यंत घातक समजला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.