नांदेड - इंडोनेशियावरून नांदेडला आलेल्या बारा आणि मरकज संबंधित पाच जणांना नांदेड येथे होम क्वॉरेंटाईन केले होते. त्यांचा सुरुवातीचा वैद्यकीय अहवाल निगेटीव्ह आला होता. आता त्यांचा होम क्वॉरेंटाईन कालावधी संपला असून पुन्हा केलेल्या तपासणीतही त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जरा सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
कोरोना लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा जुन्या नांदेड शहरात इंडोनेशिया येथून आलेले बारा नागरिक आणि दिल्लीशी संबंधित पाच नागरिक अशा एकूण सतरा जणांना होम क्वॉरेंटाईन करण्यात आले होते. नियमानुसार त्यांचा क्वॉरेंटाईनचा कालावधी संपत असल्याने पुन्हा त्यांचे नमुने औरंगाबादच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसीकर यांनी दिली.