नांदेड - जिल्ह्यात आज (दि. 20 मे) 162 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यासाठी 2 हजार 563 जणांची चाचणी करण्यात आली होती. 162 पैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 106 तर अँटिजेन तपासणीद्वारे 56 अहवाल बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 87 हजार 636 एवढी झाली असून यातील 83 हजार 539 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. सध्या 1 हजार 848 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार घेत असून 85 बाधितांची प्रकृती आज अतिगंभीर आहे.
एका दिवसात तीन मृत्यू
दिनांक 19 मे रोजी आश्विनी कोविड रुग्णालयात नायगाव तालुक्यातील शेळगाव येथील 88 वर्षाचा पुरुष, शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे विष्णुपूरी नांदेड येथील 31 वर्षाचा पुरुष व हदगाव येथील 75 वर्षांच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 833 एवढी आहे.
1 हजार 848 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू
आज (दि. 20 मे) 1 हजार 848 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 58, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 56, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 55, बारड कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 43, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 18, देगलूर कोविड रुग्णालय 5, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 16, भोकर कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 5, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 15, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 9, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 32, मुदखेड कोविड केअर सेंटर 10, अर्धापूर कोविड केअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर 30, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, एनआरआय कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 2, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरण 88, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 10, खासगी रुग्णालय 329 व्यक्ती उपचार घेत आहेत.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 82, जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय नांदेड येथे 80, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 85, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकूण घेतलेले स्वॅब - 5 लाख 6 हजार 932
एकूण निगेटिव्ह स्वॅब - 4 लाख 8 हजार 906
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती - 87 हजार 636
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या - 83 हजार 539
एकूण मृत्यू संख्या -1 हजार 833
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - 95.32 टक्के
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-16
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-232
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 848
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-85
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचा उद्रेक; ९२ रुग्ण, १२ मृत्यू