नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 356 अहवालापैकी 1 हजार 288 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 675 तर अँटिजेन तपासणीद्वारे 613 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 63 हजार 799 एवढी झाली असून यातील 47 हजार 799 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 13 हजार 517 रुग्ण उपचार घेत असून 226 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. दि. 13 ते 15 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 177 एवढी झाली आहे.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी -15
जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड - 8
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड - 12
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 3 लाख 96 हजार 218
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 24 हजार 740
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 63 हजार 799
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 48 हजार 846
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 177
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.56 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-39
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-56
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-380
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-13 हजार 517
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-226