ETV Bharat / state

नांदेड: वर्षभरात १२२ शेतकऱ्यांच्या आत्महत्या - नांदेड शेतकरी आत्महत्या न्यूज

सततचा ओला आणि कोरडा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर, पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये 2019 या वर्षात 122 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या
author img

By

Published : Jan 5, 2020, 12:14 PM IST

नांदेड - कधी दुष्काळाने तर कधी अतिवृष्टीने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 2019 या वर्षात 122 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2018 मध्ये 98 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होता. यावर्षी हा आकडा 24 ने वाढला आहे.

वर्ष भरात १२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

सततचा ओला आणि कोरडा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर, पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या.

हेही वाचा - सत्ता गेल्याने विरोधकांची अवस्था पाण्याबाहेर पडलेल्या माशा सारखी, बाळासाहेब थोरातांचा टोला

आत्महत्या केलेल्या 122 शेतकऱ्यांपैकी 99 शेतकरी कुटुंब मदतीसाठी पात्र, 12 अपात्र ठरले आहेत. 11 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या -

जानेवारी - 7
फेब्रुवारी - 10
मार्च - 10
एप्रिल - 3
मे - 12
जून - 11
जुलै - 11
ऑगस्ट - 13
सप्टेंबर - 9
ऑक्टोबर - 7
नोव्हेंबर- 18
डिसेंबरमध्ये - 8

Intro:नांदेड जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने वर्षभरता १२२ शेतकऱ्यानी मृत्यूला कवटाळले....!

नांदेड: सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थाबंण्याचे नाव घेत नाही. २०१९ या वर्षात १२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. गतवर्षी ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होता. मागच्या तुलनेत यंदा २४ ने हा आकडा वाढला असून कोरडा व ओला दुष्काळ ही दोन्ही कारणे यांस कारणीभूत ठरत आहेत. Body:नांदेड जिल्ह्यात सततच्या दुष्काळाने वर्षभरता १२२ शेतकऱ्यानी मृत्यूला कवटाळले....!

नांदेड: सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थाबंण्याचे नाव घेत नाही. २०१९ या वर्षात १२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. गतवर्षी ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होता. मागच्या तुलनेत यंदा २४ ने हा आकडा वाढला असून कोरडा व ओला दुष्काळ ही दोन्ही कारणे यांस कारणीभूत ठरत आहेत.

जिल्ह्यात मागील सतरा वर्षापासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासुन वाढ झाली. सततचा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचे हत्यार उपसत आहे. या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात . अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याचे धोरणही राबविल्या जाते. जिल्हा प्रशासनही आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रीत ' ' करत आहे . जिल्ह्यात सतत चार वर्ष शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी . यातुनही चुकून समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात. काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निर्सगावर अवलंबून असलेला खरीप हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. या परीस्थितीत शेतकरी कोलमडून पडल्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात.
_____________________
नांदेड जिल्ह्यात २०१९ मध्ये आजपर्यंत १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या...

जानेवारी-०७,
फेब्रुवारी-१०,
मार्च-१०,
एप्रील-०३,
मे-१२,
जून-११,
जुलै-११,
ऑगष्ट-१३,
सप्टेंबर-०९,
ऑक्टोबर-०७
नोव्हेंबर-१८
डिसेंबरमध्ये-०८
घटना घडल्या आहेत .

ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या. याच काळात नोव्हेंबरमध्ये अठरा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
_____________________
सहा वर्षांत ८६१ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले.....

२०१४ -११८,
२०१५-१९०,
२०१६-१८०,
२०१७-१५३,
२०१८-९८,
२०१९-१२२
चालू वर्षातील १२२ घटना घडल्या. यातील ९९ शेतकरी कुंटूब मदतीसाठी पात्र ठरले आहेत. १२ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. तसेच ११ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.
_____________________Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.