ETV Bharat / state

नांदेडात रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी, एकूण आकडा 45 वर

author img

By

Published : May 10, 2020, 7:35 AM IST

दोन आठवड्यापूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेल्या नांदेड जिल्ह्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शनिवारी १२ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या नवीन रुग्णांसह नांदेडच्या एकूण बाधितांची संख्या ४५ झाली आहे.

नांदेडात रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी, एकूण आकडा 45 वर
नांदेडात रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी, एकूण आकडा 45 वर

नांदेड - शहरात शनिवारी दिवसभरात एकूण सात कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून सायंकाळी पुन्हा पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नांदेडच्या करबला भागातील एका वृद्धाचा मृत्यू झाला असून मृत्यूनंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नांदेडमधील कोरोना रुग्णांची संख्या आता 45 गेली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. चार पैकी नांदेडमधील तीन जण हे रहमतनगरचे असून एक जण माहुरचा आहे.

करबला भागातील एका वक्तीला ८ मे रोजी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा ९ मे रोजी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला असता पॉझिटिव्ह आला आहे. रहमतनगरमधील दोन चौदा वर्षीय बालक असून एक 32 वर्षीय महिला आहे. तर माहूर मधील सापडलेला 64 वर्षीय पुरुष असून सध्या प्रकृती स्थिर आहे.

नांदेड जिल्हा कोरोना विषाणू संसर्गाबाबत माहिती

• आत्तापर्यंत एकूण संशयित - 1688
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या- 1588
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 528
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 96
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 233
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - 1366
• आज तपासणीसाठी नमुने घेतले- 88
• एकुण नमुने तपासणी- 1590
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 45
• पैकी निगेटीव्ह - 1423
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 93
• नाकारण्यात आलेले नमुने - 6
• अनिर्णित अहवाल – 22
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 5
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 94 हजार 930 आहेत. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.