नांदेड - मंगळवारी ग्रामीण भागातील बारड येथे रुग्ण सापडल्यानंतर रात्री उशिरा पुन्हा दहा रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व रूग्ण नगिणाघाट परिसरातील आहेत. नव्याने सापडलेल्या ११ रुग्णांमुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ६३ गेली आहे.
शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी १५ नमुन्यांपैकी ११ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून 1 अहवाल निगेटिव्ह आहे. ४ नमून्याचे अहवाल येणे बाकी आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये 35 ते 69 वयोगटातील सहा महिला आणि एका सात वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. 25 ते 55 वयोगटातील ४ पुरुषांचाही समावेश आहे. यात हरियाणाच्या फरीदाबादमधील दोन व्यक्ती आणि दिल्ली व पंजाबमधील प्रत्येकी एका व्यक्तिचा समावेश आहे. या सर्व 10 रुग्णांवर यात्री निवासात तयार केलल्या कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वांनी आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करून घ्यावे जेणेकरून आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील अॅप सतर्क करण्यास मदत करते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.