नांदेड - जिल्ह्यात आज शनिवार ३० मे रोजी सांयकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या १३१ व्यक्तींच्या तपासणी अहवालापैकी ११२ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यात १ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही १४४ झाली आहे. हा रुग्ण इतवारा भागातील ३२ वर्ष वयाचा पुरुष असून त्याच्यावर एनआरआय कोविड केअर सेंटर येथे उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आज ग्रामीण रुग्णालय भोकर कोविड केअर सेंटर येथील १ रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील २ रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी नांदेड येथील १ रुग्ण असे एकूण ४ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत १०३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
उर्वरित ३३ रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील महिला रुग्ण वय वर्षे ५२ व ५५ यांची प्रकृती सद्यस्थितीत गंभीर आहे. कोरोना संशयित व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- १ लाख ३९ हजार १३४
घेतलेले स्वॅब ३ हजार ८२५
निगेटिव्ह स्वॅब ३ हजार ३५०
आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ०१,
एकुण पॉझिटिव्ह रुग्ण १४४,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या १४८,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या १३,
मृत्यू संख्या ८,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या १०३,
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण ३३,
स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या १५२ एवढी आहे.
दि. २९ मे रोजी पाठविण्यात आलेल्या ७८ स्वॅब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील. आज ३० मे रोजी ७४ रुग्णांची स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील. एकूण १४४ रुग्णांपैकी ८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व १०३ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
उपचार घेत असलेल्या ३३ रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड ८ रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे एकूण १५, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे २, ग्रामीण रुग्णालय, माहूर येथे १ रुग्ण व उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे १ रुग्ण व ग्रामीण रुग्णालय कोविड केअर सेंटर उमरी येथे ४ रुग्ण, असून २ रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहेत.