ETV Bharat / state

ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या 10 गायींचा गुदमरून मृत्यु - गायी ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी

पोलिसांनी ट्रकमधील मालाची पाहणी केली असता दोन माळे तयार करून त्यात ६५ ते ७० गायी कोंबून भरल्याचे समोर आले. यातील १० गायींचा गुदमरून मृत्यू झाला होता. ट्रक रस्त्यावर थांबवून चालक फरार झाला होता. या गायी कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेल्या जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या 10 गायींचा गुदमरून मृत्यु
author img

By

Published : Oct 18, 2019, 3:59 AM IST

नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर वळण रस्त्यावर एका ट्रकमध्ये ६५ ते ७० गायींना कोंबून वाहतूक केली जात होती. हा ट्रक अर्धापूर पोलिसांनी पाठलाग करून पकडला असता ट्रकमधील १० गायींचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृत गायींना क्रेनच्या सहाय्याने उतरवून अर्धापूर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दफन करण्यात आले आहे. दरम्यान या घटने नंतर वाहन चालक फरार झाला असून अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या 10 गायींचा गुदमरून मृत्यु

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली कडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रक क्रं. एम.पी.०९ एच.जी.- १९८६ मधून गायींची वाहतूक होत असल्याचा सुगावा अर्धापूर पोलिसांना लागला. हा ट्रक हिंगोली कडून नांदेडकडे जात असताना अर्धापूर वळण रस्त्यावरील तामसा चौकात कर्तव्यावर असलेले अर्धापूर ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विद्यासागर वैद्य व जमादार परमेश्वर कदम यांनी या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने त्याने ट्रक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - आंध्र प्रदेश : गौशाळेमध्ये 100 गायी आढळल्या मृत अवस्थेत, विषबाधा झाल्याचा संशय

पोलिसांनी अधिक कुमक मागवून काही अंतरावर असलेल्या अर्धापूर-वसमत रोडवर ट्रकला पकडला. ट्रक रस्त्यावर थांबवून चालक फरार झाला होता. पोलिसांनी ट्रकमधील मालाची पाहणी केली असता दोन माळे तयार करून त्यात ६५ ते ७० गायी कोंबून भरल्याचे समोर आले. यातील १० गायींचा गुदमरून मृत्यू झाला होता. तर, ५० ते ५५ गायींना जिवंत बाहेर काढण्यात आले. घायाळ झालेल्या गायींवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. अर्धापूर पोलीस ठाणे परिसरात जेसीबी द्वारे खड्डा करून मृत गायींना दफन करण्यात आले. या गायी कत्तलीसाठी हैदराबाद येथे नेल्या जात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत गायीना पाहण्यासाठी ठाण्यात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Intro:ट्रकमध्ये कोंबून गायीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अर्धापूर पोलिसांनी पकडले.... 

     ● दहा गायीचा गुदमरून मृत्यू.

     ● अर्धापूर पोलीस ठाण्यात अंत्यसंस्कार. 
Body:ट्रकमध्ये कोंबून गायीची वाहतूक करणाऱ्या ट्रकला अर्धापूर पोलिसांनी पकडले.... 

     ● दहा गायीचा गुदमरून मृत्यू.

     ● अर्धापूर पोलीस ठाण्यात अंत्यसंस्कार. 

                 नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्धापूर वळण रस्त्यावर एका ट्रकमध्ये ६५ ते ७० गायींना कोंबून वाहतूक करणारा ट्रक अर्धापूर पोलिसांनी पाठलाग करून पकडला. ट्रकमधील १० गायीचा गुदमरून मृत्यू झाला होता. या मृत गायींना क्रेनच्या सहाय्याने उतरून अर्धापूर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दफन करण्यात आले. ही घटना दि. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या मृत गायीना पाहण्यासाठी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. 

          □ या बाबत अधिक माहिती अशी की हिंगोली कडून नांदेडकडे जाणा-या ट्रक क्रं. एम.पी.०९ एच.जी.- १९८६ मधून गायीची वाहतूक होत होती. याचा सुगावा अर्धापूर पोलिसांना लागला. हा ट्रक हिंगोली कडून नांदेडकडे जात असताना अर्धापूर वळण रस्त्यावरील तामसा चौकात कर्तव्यावर असलेले अर्धापूर ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विद्यासागर वैद्य व जमादार परमेश्वर कदम यांनी अर्धापूर वळण रस्त्यावर या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न केला. ही बाब ट्रक चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी आपला ट्रक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आणि साईड मारून फरार झाला. 

          □ पोलिसांनी अधिक कुमक मागवून या ट्रकचा पाठलाग केला आणि काही अंतरावर असलेल्या अर्धापूर - वसमत रोडवर ट्रकला पकडला. ट्रक रस्त्यावर थांबवून चालक फरार झाला. पोलिसांनी दुसर्‍या चालकाच्या सहाय्याने ट्रक ठाण्यात आणून  ट्रकमधील मालाची पाहणी केली असता त्यात ट्रकमध्ये दोन माळे तयार करून त्यात ६५ ते ७० गायी कोंबून भरल्याचे निष्पन्न झाले. गायीसह ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला. येथे क्रेनच्या सहाय्याने सर्व गायी बाहेर काढण्यात आल्या. यातील १० गायीचा गुदमरून मृत्यू झाला होता. तर ५० ते ५५ गायीना जिवंत बाहेर काढण्यात आले. या घायाळ झालेल्या गायीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. अर्धापूर पोलीस ठाणे परिसरात जेसीबी द्वारे मोठा खड्डा करून मृत्यू गायीना दफन करण्यात आले. 

           □ या गायी कत्तलखान्यासाठी हैदराबाद येथे जात असल्याचा अंदाज व्यक्त होत असून मृत गायीना पाहण्यासाठी ठाण्यात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तर या मृत गायींना पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सध्या गोवंश हत्या बंदी असताना चोरटय़ा मार्गाने या गायी कतलीसाठी जात होत्या. वाहन चालक फरार झाला असला तरी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.