नागपूर - दारूची उदारी दिली नाही म्हणून एका तरुणाची हत्या झाल्याचे धक्कादायक प्रकार पुढे आले आहे. नागपुरातील यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांजरी गावात हा सगळा प्रकार घडला. विशेष म्हणजे आरोपी हे मृताचेच मित्र असून दारूची उधारी का दिली नाही? या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान या हत्येमागील तीनही आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे.
जिल्ह्यात गुन्ह्याचे सत्र काही थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात नागपुरात २ हत्येची प्रकरणे पुढे आली आहेत. अशातच दारूच्या उधारी वरून एका २२ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे. नागपूरलगत असलेल्या मांजरी या गावात ही घटना घडली. दारूची उदारी दिली नाही म्हणून तलवारीने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नागपुरातील यशोधरा नगर पोलीस स्टेशन अंतर्गत या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून या घटनेतील तीनही आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
विशेष म्हणजे हत्या करणारे तीनही आरोपी मृताचे मित्रच असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. शिवाय वेळेवर उधारी परत केली नाही म्हणून हत्या केल्याची कबूली आरोपींनी दिली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक रमाकांत दुर्गे यांनी दिली. गोलू राऊत, राकेश परिमल व अभिषेक असे तीनही आरोपीचे नाव आहे. शिवाय यांच्या विरोधात याआधी कोणतेही गुन्हे नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मात्र, या घटनेबाबत पुढील तपास यशोधरा नगर पोलीस करत असल्याचे पोलीस निरिक्षक दुर्गे यांनी सांगितले.