नागपूर - आगामी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सूचक वक्तव्य युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे. अनेक नेत्यांनी कमळ हातात घेतल्याने तरुण उमेदवारांना संधी मिळण्याला वाव निर्माण झाल्याचे देखील ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत युवक काँग्रेसने राज्यात 60 जागांची मागणी केल्याची माहिती सत्यजित तांबे यांनी दिली. 'वेकअप महाराष्ट्र' या युवक काँग्रेसच्या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवक काँग्रेसने 60 जागांची मागणी केली. तरीही आघाडीत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याने युवक काँग्रेसने मागणी केलेल्या जागा कुठल्या, हे सांगणे तांबे यांनी टाळले. सध्या काँग्रेसमधून अनेक नेते दुसऱ्या पक्षात जात आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाकरिता हा संक्रमणाचा काळ असतानाच काँग्रेसमधील तरुणांसाठी संधी असल्याचेही सत्यजित तांबे यावेळी म्हणाले.