नागपूर - शहरातील महाल परिसरातील राम कुलर चौकात दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. कमी वर्दळ असलेल्या रस्त्यावर झालेल्या या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळीहा अपघात झाला असून अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रुचित मदने असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही चित्रण सोमवारी समोर आले.
हेही वाचा -
क्षुल्लक भांडणातून एकाची हत्या : पाच आरोपी गजाआड, एका विधिसंघर्ष बालकाचा समावेश
मृत रुचित मदने हा गांधी गेटकडून अशोक चौकाच्या दिशेने वेगाने जात असताना राम कुलर चौकात एक दुचाकीस्वार महिला त्याच वेळी रस्ता ओलांडण्यासाठी आली. यावेळी दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, रुचित मदने वेगाने दुभाजकांवर जाऊन आदळला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यु झाला. ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी तुरळक वर्दळ होती. मात्र, रुचित हा भरधाव वेगात होता. तर त्याला धडक दिलेली महिलेने रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला न बघितल्याने हा अपघात घडल्याने रुचितचा मृत्यू झाला.